Marathi

पोषक तत्वांचा खजिना

अंडी उकडताना, त्याच्या कवचातील कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरससारखे सूक्ष्म पोषक घटक पाण्यात उतरतात. हे पाणी झाडांसाठी एक नैसर्गिक खत आहे.

Marathi

झाडं हिरवीगार राहतील

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे झाडांची मुळं आणि पानं लवकर कोमेजतात. अशावेळी हे पाणी वापरल्यास झाडांची मुळं मजबूत होतात आणि झाडं हिरवीगार दिसतात.

Image credits: magnific
Marathi

भरपूर फुलं आणि फळं येतील

विशेषतः गुलाब, जास्वंद आणि भाजीपाल्याच्या रोपांसाठी हे पाणी अमृतासमान आहे. याच्या वापरामुळे झाडांना जास्त कळ्या येतात आणि भरपूर फुलं लागतात.

Image credits: INSTAGRAM
Marathi

मातीचा पोत सुधारेल

रासायनिक खतांऐवजी हे नैसर्गिक पाणी वापरल्यास मातीचा pH स्तर संतुलित राहतो. यामुळे मातीची सुपीकता वाढण्यास मदत होते.

Image credits: Getty
Marathi

पाणी वापरण्याची योग्य पद्धत

अंडी उकडलेलं पाणी थेट झाडांना घालू नका. ते पाणी पूर्णपणे थंड झाल्यावरच (Normal temperature) झाडांच्या मुळाशी टाका.

Image credits: Getty
Marathi

ही काळजी नक्की घ्या!

अंडी उकडताना पाण्यात मीठ (Salt) टाकलं असेल, तर ते पाणी झाडांसाठी कधीही वापरू नका. फक्त मीठ न टाकलेलंच पाणी झाडांना घाला.

Image credits: Getty

Cholesterol : सावधान! हे ६ पदार्थ तुमच्या शरीरात वाढवतात बॅड कोलेस्ट्रॉल

Peanuts : रोज मूठभर शेंगदाणे खाल्ल्यास काय होतं? जाणून घ्या फायदे

महागड्या CC क्रीमला विसरा, हा घरगुती उपाय देईल चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो!

मरून रंगासोबत लावा 'या' 6 शेड्स, प्रत्येक स्किन टोनवर दिसतील परफेक्ट