गुलाबी रंगातील सिल्क साडी कोणत्याही फंक्शनसाठी बेस्ट आहे. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज सूट होईल.
काळ्या रंगातील कॉटन सिल्क साडीत अनुष्का शेट्टीचा लूक अधिकच खुललेला दिसतोय. एखाद्या पार्टी-फंक्शनवेळी अशाप्रकारची साडी नेसू शकता.
ऑरेंग रंगातील नेट साडीत अनुष्का सुंदर दिसतेय. या साडीवर सिल्व्हर सीक्वेंस वर्क ब्लाऊज ट्राय करू शकता.
क्रेप साडी फिट फिगर असणाऱ्या महिलांना फार सुंदर दिसते. सेमी-फॉर्मल किंवा कॅज्युअल इवेंट्ससाठी अशाप्रकारची साडी बेस्ट आहे.
लग्नसोहळ्यावेळी अनुष्का शेट्टीसारखी नारंगी रंगातील कांजीवरम साडी नेसू शकता. यावर गोल्डन ज्वेलरी छान दिसेल.
फ्लोरल बॉर्डर असणाऱ्या काळ्या रंगातील साडीही प्रत्येक फिगरमधील महिलेसाठी परफेक्ट आहे. 1 हजार रुपयांपर्यंत अशाप्रकारची साडी मार्केटमध्ये खरेदी करता येईल.
पारंपारिक कांजीवरम साडी कोणत्याही बॉडी टाइपसाठी परफेक्ट आहे. अनुष्का शेट्टी जांभळ्या रंगातील कांजीवरम साडीत फार सुंदर दिसतेय.