बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला आणि २२ प्रतिज्ञा दिल्या. या प्रतिज्ञा म्हणजे सामाजिक परिवर्तनाची बीजं होती.
आंबेडकरांचा या २२ प्रतिज्ञांमागचा हेतू कोणाचाही अपमान करणे नव्हता, तर अंधश्रद्धा, कर्मकांड व अन्यायकारक परंपरांपासून समाजाला मुक्त करणे हा होता.
बाबासाहेब मूर्तीपूजा, चमत्कार, श्राद्ध, कुलाचार इत्यादींवर विश्वास ठेवत नव्हते. त्यांनी वैज्ञानिक आणि समतावादी जीवनशैलीचा आग्रह धरला.
बाबासाहेबांना माहीत होतं की प्रत्येक जण पालि भाषा समजू शकत नाही. म्हणून त्यांनी २२ प्रतिज्ञांच्या रूपात धम्माचं सार दिलं.
बौद्ध धम्म स्वीकारल्यावर पुन्हा जुन्या विचारांकडे आपले अनुयायी परतू नये म्हणून बाबासाहेबांनी या प्रतिज्ञा दिल्या आसाव्यात.
२२ प्रतिज्ञा म्हणजे माणसाला मानवी प्रतिष्ठा देणारा, मानसिक गुलामगिरीपासून मुक्त करणारा मार्ग!
धर्मांतर म्हणजे केवळ धर्म बदलणे नव्हे, तर एक समतेवर आधारित समाज निर्माण करण्याची क्रांती होती.
बाबासाहेबांचा दृष्टिकोन वैज्ञानिक, विवेकी आणि आधुनिक होता. धर्माच्या नावावर असलेल्या अन्यायकारक प्रथा त्यांनी फेटाळल्या.
या प्रतिज्ञांमुळे हजारो लोकांनी आपला स्वाभिमान शोधला. त्या आजही अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा देतात.
२२ प्रतिज्ञा म्हणजे फक्त धार्मिक विधान नव्हे, तर आत्मसन्मान, समता, आणि परिवर्तनाची चळवळ आहे! जय भीम!