Marathi

मेंदूला तल्लख करणारे हे ९ सुपरफूड्स

Marathi

फॅटी फिश किंवा चरबीयुक्त मासे

सॅल्मन, सार्डिन आणि मॅकेरलसारख्या माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असते. हे मेंदू निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Image credits: Getty
Marathi

ब्लूबेरी

अँथोसायनिन आणि इतर अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण ब्लूबेरी मेंदूचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि सूज कमी करते. यामुळे स्मरणशक्ती सुधारते.

Image credits: Getty
Marathi

हिरव्या पालेभाज्या

पालक आणि ब्रोकोलीसारख्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन के, ल्युटीन, फोलेट आणि बीटा कॅरोटीनसारखे महत्त्वाचे घटक असतात. हे मेंदूच्या पेशी सुरक्षित ठेवतात.

Image credits: Getty
Marathi

अंडी

अंड्यांमध्ये कोलीन नावाचा एक महत्त्वाचा घटक असतो. हा घटक स्मरणशक्ती आणि मूड नियंत्रित करण्यास मदत करतो.

Image credits: Getty
Marathi

ड्रायफ्रुट्स आणि सीड्स

विविध प्रकारचे ड्रायफ्रुट्स आणि बिया खाल्ल्याने पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण मिळते.

Image credits: Getty
Marathi

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि कॅफीन असते. यामुळे मेंदूला रक्तपुरवठा वाढतो, मूड चांगला राहतो आणि स्मरणशक्ती सुधारते.

Image credits: Getty
Marathi

धान्य

ओट्स, बार्ली आणि ब्राऊन राइस यामुळे मानसिक ऊर्जा आणि उत्साह टिकून राहण्यास मदत होते.

Image credits: Getty
Marathi

कॉफी

कॉफीमधील कॅफीन तुम्हाला अलर्ट ठेवते आणि एकाग्रता वाढवते. शिवाय यामध्ये पॉलिफेनॉलसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात.

Image credits: Getty
Marathi

ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड असते. यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.

Image credits: Getty

Kidney Stone Symptoms : किडनी स्टोनच्या या लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

Heart Health : हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी खा हे पदार्थ

Beetroot Benefits : दररोज बीटरूट खाल्ल्याने शरीरात होतात हे 7 बदल

Mangalsutra Designs : साडीला स्टायलिश लूक देणाऱ्या मंगळसूत्रांच्या डिझाईन्स