अनेकदा चपात्या बनवल्यानंतर काही वेळाने त्या कडक आणि वातड होतात. पण काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही दिवसभर मऊ राहतील अशा चपात्या बनवू शकता.
Lifestyle Sep 10 2026
Author: Karishma R Image Credits:our own
Marathi
कोमट पाणी किंवा दुधाचा वापर करा
गव्हाचं पीठ मळताना थंड पाण्याऐवजी कोमट पाणी किंवा कोमट दुधाचा वापर करा. यामुळे पिठातील ग्लुटेन सक्रिय होतं आणि पीठ चांगलं मऊ होतं.
Image credits: Freepik
Marathi
एक छोटा चमचा तेल किंवा तूप घाला
पीठ मळताना त्यात एक छोटा चमचा तेल किंवा साजूक तूप घाला. पीठ चांगलं मऊ आणि गुळगुळीत होईपर्यंत साधारण ५ ते ८ मिनिटं व्यवस्थित मळून घ्या.
Image credits: Getty
Marathi
पीठ ओल्या कापडाने झाकून ठेवा
मळलेलं पीठ ओल्या सुती कापडाने झाकून किमान २० मिनिटं बाजूला ठेवा. असं केल्याने पीठ चांगलं मुरतं, मऊ होतं आणि चपात्या लाटायला सोप्या जातात.
Image credits: Freepik
Marathi
तवा चांगला गरम झाल्यावरच चपाती भाजा
चपाती भाजण्यापूर्वी तवा चांगला गरम करून घ्या. गरम तव्यावर चपाती टाकल्यास ती लगेच फुगते आणि आतून-बाहेरून व्यवस्थित शिजून मऊ राहते.
Image credits: Freepik
Marathi
गरम चपातीला तूप किंवा लोणी लावा
तव्यावरून काढल्या काढल्या गरम चपातीला थोडं तूप किंवा लोणी लावा. यामुळे चपात्यांना छान चव येते आणि त्या जास्त वेळ मऊ राहतात. नंतर त्या हॉट बॉक्समध्ये ठेवा.
Image credits: social media
Marathi
पीठ मळताना दह्याचा वापर करा
गव्हाच्या पिठात थोडं दही घालूनही तुम्ही चपातीचं पीठ मळू शकता. पीठ मळून झाल्यावर एक ते दोन तास तसंच ठेवा आणि मग चपात्या बनवा. चपात्या नक्की मऊ होतील.
Image credits: Getty
Marathi
खोबरेल तेल घालूनही पीठ मळू शकता
तुमच्याकडे तूप किंवा दही नसेल, तर काळजी करू नका. तुम्ही थोडं खोबरेल तेल घालूनही चपातीचं पीठ मळू शकता. यामुळेसुद्धा चपाती अधिक मऊ होते.