चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात का? तर मग ही समस्या दूर करण्यासाठी हे सात सोपे घरगुती उपाय नक्की करून पाहा.
Lifestyle Mar 09 2026
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social media
Marathi
कडुलिंब आणि हळद
कडुलिंबाची पानं वाटून त्यात चिमूटभर हळद मिसळा. हा लेप पिंपल्सवर लावा. २० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे इन्फेक्शन रोखण्यास मदत होते.
Image credits: Instagram
Marathi
कोरफड
कोरफडीचा गर थेट पिंपल्सवर लावणं खूप फायदेशीर आहे. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि पिंपल्स लवकर सुकण्यास मदत होते.
Image credits: Getty
Marathi
मध
मध एक नैसर्गिक अँटीसेप्टिक आहे. रात्री झोपण्यापूर्वी थोडंसं मध पिंपल्सवर लावा. यामुळे पिंपल्स लवकर बसतात.
Image credits: meta ai
Marathi
आईस थेरपी
पॅप्युल्ससारख्या (Papules) वेदनादायक पिंपल्सवर बर्फाचा खडा एका स्वच्छ कापडात गुंडाळा. तो ५-१० सेकंद पिंपलवर ठेवा. यामुळे वेदना कमी होतात आणि सूजही उतरते.
Image credits: Freepik
Marathi
टोमॅटोचा रस
तुमची त्वचा तेलकट असेल तर टोमॅटोचा रस लावा. यामुळे सेबमचं (नैसर्गिक तेल) उत्पादन कमी होतं आणि त्वचा स्वच्छ राहते.
Image credits: Getty
Marathi
मुलतानी माती
मुलतानी मातीमध्ये थोडं दूध मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट पिंपल्स असलेल्या भागावर लावा. पूर्णपणे सुकल्यावर चेहरा स्वच्छ धुवा.