सांबार करायला वेळ लागतो. आणि रोज सांबार खायला कंटाळा येतो. म्हणून ताकासोबत भातात खाण्यासाठी या झटपट पदार्थांचा प्रयत्न करा.
आंब्याच्या गरात थोडे खोबरे घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यात जिरे, उडीद डाळ, मोहरी, हिंग, हिरवी मिरची घालून फोडणी द्या. चवीपुरते मीठ घाला.
वांगी/ फणस/ भेंडी पाण्यात शिजवून घ्या. त्यात हिंग, उडीद डाळ, मोहरी, जिरे, हिरवी मिरची घालून फोडणी द्या. मीठ घाला. ताक किंवा लिंबूरस घाला.
पाण्यात लिंबाचा रस घाला. उडीद डाळ, मोहरी, हिंग, हिरवी मिरची घालून फोडणी द्या. चवीपुरते मीठ घाला.
थोडे आंबट ताकात उडीद डाळ, मोहरी, हिरवी मिरची, हिंग, कांदा किंवा लसूण घालून फोडणी द्या. चवीपुरते मीठ घाला.
पाण्यात टोमॅटो शिजवून घ्या. त्यात उडीद डाळ, मोहरी, हिंग, कांदा, हिरवी मिरची घालून फोडणी द्या. चवीपुरते मीठ घाला.
पावसाळ्यात चेहऱ्यावर येणाऱ्या अॅक्नेवर उपाय, आठवड्यात दिसेल फरक
ऑफिस लूकसाठी 500 रुपयांत खरेदी करा कडा पैंजण, पाहा लेटेस्ट डिझाइन
प्रत्येक महिलेकडे असाव्यात या 8 Handmade Sarees
लहान डोळ्यांना या 5 पद्धतीने लावा लाइनर, खुलेल सौंदर्य