Marathi

थंडीत मुलायम त्वचेसाठी एलोवेरा जेलचा असा करा वापर, खुलेल सौंदर्य

Marathi

एलोवेराचे फायदे

एलोवेरामध्ये त्वचा नैसर्गिक पद्धतीने हाइड्रेट करण्याचे गुणधर्म असतात. याचा थंडीत योग्य प्रकारे वापर केल्यास त्वचा मुलायम, चमकदार आणि हेल्दी होण्यास नक्कीच मदत होईल.

Image credits: social media
Marathi

बदामाचे तेल, मध आणि एलोवेरा

दामाच्या तेलामुळे त्वचा मऊ होण्यास मदत होईल. याशिवाय मधात अँटी-ऑक्सिडेंट्स असतात. अशातच बदामाचे तेल, मध आणि एलोवेराच्या फेस मास्कने त्वचा मऊ होण्यास मदत होईल.

Image credits: Social Media
Marathi

असा तयार करा फेस मास्क

एलोवेरा जेलमध्ये बदामाचे तेल आणि मध मिक्स करुन चेहरा आणि मानेला लावा. 15-20 मिनिटांनी चेहऱ्याला फेस मास्क लावल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

Image credits: social media
Marathi

बेसन, हळद आणि एलोवेरा

बेसनामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होण्यास मदत होते. तर हळदीमधील अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म सूज आणि जळजळची समस्या कमी करतात.

Image credits: PINTEREST
Marathi

असा तयार करा फेस पॅक

बेसन, हळद आणि एलोवेरा जेल एकत्रित मिक्स करुन घट्ट पेस्ट तयार करा. फेस मास्क चेहऱ्यावर 15-20 मिनिटे ठेवल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. या फेस मास्कमुळे थंडीत त्वचा मऊ होईल. 

Image credits: PINTEREST
Marathi

मसूर डाळ आणि एलोवेरा

मसूर डाळीमध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. यामुळे त्वचा हेल्दी राहण्यास मदत होते. मसूर डाळीसोबत एलोवेरा जेल मिक्स केल्यास त्वचा एक्सफोलिएट होण्यास मदत होते.

Image credits: Getty
Marathi

असा तयार करा फेसपॅक

मसूर डाळीची पेस्ट तयार करुन त्यामध्ये एलोवेरा जेल मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्याला 10 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावर चमक येईल.

Image credits: Freepik
Marathi

Disclaimer

 सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty

दररोज 10,000 पावले चालण्याचे फायदे, नवीन वर्षापासून करा सुरुवात?

New Year Celebration: भारतात नवीन वर्ष कुठं साजरा करता येईल?

तुमच्या पतीचे जुने चेक शर्ट फेकू नका, बनवा भन्नाट 7 Blouse Designs!

Chanakya Niti: लग्न करताना मुलीमध्ये कोणते गुण पाहावेत?