मंगलदास मार्केट आणि झवेरी बाजारदरम्यान असणाऱ्या प्रिंन्सेस स्ट्रीट खाऊगल्ली मुंबईत प्रसिद्ध आहे. येथे समोसा चाट, आलू पापडी, बदाम बर्फी, आइस्क्रिम चाट आणि जलेबीचा आस्वाद घेऊ शकता.
Image credits: फेसबुक
Marathi
चेंबूर खाऊगल्ली
चेंबूरमधील खाऊगल्लीत रगडा पॅटीस कुलचा, डाल पकवान, कोकी कुलचा अशा पदार्थांची चव चाखता येईल. येथील साईनाथ ढाबा प्रसिद्ध आहे.
Image credits: सोशल मीडिया
Marathi
झवेरी बाजार खाऊगल्ली
झवेरी बाजारमधील खाऊगल्लीत पाणीपुरी, भल्ला पापडी, चाट पापडी, मुंग डाळ भजी प्रसिद्ध आहेत. भगत ताराचंद, मोहम्मद पुडावाला येथेही फूड्सचा आस्वाद घेऊ शकता.
Image credits: सोशल मीडिया
Marathi
ताडदेव खाऊगल्ली
ताडदेव खाऊगल्लीत व्हेज आणि नॉन-व्हेजमध्ये वेगवेगळे पदार्थ आहेत. येथील बिर्याणी, कबाब, रोल्स आणि मोमोज प्रसिद्ध आहेत.
Image credits: सोशल मीडिया
Marathi
घाटकोपर खाऊ गल्ली
घाटकोपर खाऊ गल्ली व्हेज-नॉन व्हेज खवय्यांसाठी उत्तम आहे. मिसळ पाव, नूडल्स, डोसा, मसाला डोसा, रोल्स, कबाब आणि अंड्याच्या वेगळ्या रेसिपीही ट्राय करू शकता.
Image credits: सोशल मीडिया
Marathi
कार्टर रोड खाऊगल्ली
कार्टर रोड येथील खाऊगल्लीत पराठे, फलाफल, मोमोज आणि चायनीज पदार्थांचा आस्वाद घेता येईल. केपचाकी मोमोज, लस्सी दे परोठे या ठिकाणी नक्की भेट द्या.
Image credits: सोशल मीडिया
Marathi
एसएनडीटी ते क्रॉस मैदान खाऊ गल्ली
एसएनडीटी ते क्रॉस मैदानापर्यंतच्या भागात नेहमी गर्दी असते. येथे आलू चाट, चायनीज मंच्युरियन, पाव भाजी, फ्रँकी अशा पदार्थांची चव चाखता येते.
Image credits: सोशल मीडिया
Marathi
माहिम खाऊगल्ली
मुंबईतील माहिम दर्ग्याजवळील खाऊगल्लीत नेहमी खवय्यांची गर्दी असते. येथील बाबा फालूदा प्रसिद्ध आहे. चिकन तंदूरी, शीर खुरमा आणि तंदूरमधील वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करू शकता.
Image credits: सोशल मीडिया
Marathi
खारघर खाऊगल्ली
खारघर खाऊगल्ली उत्सव चौकाजवळ आहे. कॉलेज किंवा ऑफिसला जाणाऱ्यांसाठी ही खाऊगल्ली चमचमीत फूड्ससाठी उत्तम पर्याय आहे. येथे सेजवान मोमोज, मोमोज अशा पदार्थांची चव चाखता येईल.
Image credits: सोशल मीडिया
Marathi
मोहम्मद अली रोड खाऊ गल्ली
रमजानच्या दिवसात मीनार मस्जिद येथील खवय्यांची गर्दी पाहण्यासारखी असते. येथे वेगवेगळ्या प्रकारचे कबाब, रोल्स आणि नॉन-व्हेज पदार्थ मिळतात.