Marathi

स्वस्तात मस्त अशा मुंबईतील 10 प्रसिद्ध Khalu Galli, तोंडाला सुटेल पाणी

Marathi

प्रिंन्सेस स्ट्रीट खाऊगल्ली

मंगलदास मार्केट आणि झवेरी बाजारदरम्यान असणाऱ्या प्रिंन्सेस स्ट्रीट खाऊगल्लीही मुंबईत प्रसिद्ध आहे. येथे समोसा चाट, आलू पापडी, बदाम बर्फी, आइस्क्रिम चाट आणि जलेबीचा आस्वाद घेऊ शकता.

Image credits: facebook
Marathi

चेंबूर खाऊगल्ली

चेंबूरमधील खाऊगल्लीत रगडा पॅटीस कुलचा किंवा डाल पकवास, कोकी कुलचा अशा पदार्थांची चव चाखता येईल. येथील साईनाथ ढाबा प्रसिद्ध आहे.

Image credits: social media
Marathi

झवेरी बाजार खाऊगल्ली

झवेरी बाजारमधील खाऊगल्लीत पाणीपुरी, भल्ला पापडी, चाट पापडी, मुंग डाळ भजी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी भगत ताराचंद, मोहम्मद पुडावाला येथे फूड्सचाही आस्वाद घेऊ शकता.

Image credits: social media
Marathi

ताडदेव खाऊगल्ली

ताडदेव खाऊगल्लीत व्हेज व नॉन-व्हेजमध्ये वेगवेगळे पदार्थ खाण्याचा मोह आवरणार नाही. येथील बिर्याणी, कबाब, रोल्स आणि मोमोज प्रसिद्ध आहे.

Image credits: social media
Marathi

घाटकोपर खाऊ गल्ली

घाटकोपर खाऊ गल्ली व्हेज-नॉन व्हेज खवय्यांसाठी बेस्ट आहे. येथे मिसळ पाव, नूडल्स, डोसा, मसाला डोसासह रोल्स, कबाबसह अंड्याच्या वेगळ्या रेसिपीही ट्राय करू शकता. 

Image credits: social media
Marathi

कार्टर रोड खाऊगल्ली

कार्टर रोड येथील खाऊगल्लीत पराठे, फलाफल, मोमोजसह चायनीज पदार्थांचा आस्वाद घेता येईल. येथील केपचाकी मोमोज, लस्सी दे परोठे या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता.

Image credits: social media
Marathi

एसएनडीटी ते क्रॉस मैदान खाऊ गल्ली

एसएनडीटी ते क्रॉस मैदानापर्यंतच्या भागात नागरिकांची वर्दळ असतेच. या ठिकाणी आलू चाट, चायनीज मंच्युरियन, पाव भाजी, फ्रँकी अशा पदार्थांची चव चाखता येथील.

Image credits: social media
Marathi

माहिम खाऊगल्ली

मुंबईतील माहिम दर्ग्याजवळील खाऊगल्लीत नेहमीच खवय्यांची गर्दी पहायला मिळते. येथील बाबा फालूदा प्रसिद्ध आहे. चिकन तंदूरी, शीर खुरमासह तंदूरमधील वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करू शकता.

Image credits: social media
Marathi

खारघर खाऊगल्ली

खारघर खाऊगल्ली उत्सव चौकाजवळ आहे. कॉलेजला किंवा ऑफिसला जाणाऱ्यांसाठी ही खाऊगल्ली चमचमीत फूड्ससाठी बेस्ट पर्याय आहे. येथे सेजवान मोमोज, मोमोज अशा पदार्थांची चव चाखता येईल.

Image credits: social media
Marathi

मोहम्मद अली रोड खाऊ गल्ली

रमजानच्या दिवसात मीनार मस्जिद येथील खवय्यांची गर्दी पाहण्यासारखी असते. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कबाब, रोल्स किंवा नॉन-व्हेजच्या पदार्थांचा आस्वाद घेता येतो. 

Image credits: social media

मुंबईत सर्वोत्कृष्ट वडा पाव कोठे मिळतो?, जाणून घ्या ही 10 फेमस ठिकाणे

सासू-सुनेच्या नात्यात येईल प्रेमाचा बहर! गिफ्ट द्या 6 प्लेन सॅटिन साडी

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी सांगितले दिवसा झोपण्याचे तोटे

वाईन पिल्यानंतर शरीराला काय फायदे होतात, रेड वाईन पिणे फायदेशीर