खडे बसवलेले हे बटरफ्लाय लॉकेट दिसायला खूपच नाजूक आणि स्टायलिश दिसते. रोजच्या वापरासाठी तुम्ही याची नक्कीच निवड करू शकता.
फिश डिझाईनचे हे लॉकेट वजनाला खूप हलके असते. एका नाजूक चेनसोबत हे लॉकेट घातल्यास ते खूपच सुंदर दिसते.
तुम्हाला पारंपारिक लूक आवडत असेल, तर तुम्ही हे मोती बसवलेले लॉकेट निवडू शकता. हे लॉकेट तुमच्या गळ्याचे सौंदर्य आणखी वाढवेल.
स्टार डिझाईनचे लॉकेट नेहमीच फॅशनमध्ये असते. हलक्या वजनाचे हे लॉकेट कॉलेजला जाणाऱ्या तरुणींना खूप छान दिसेल.
हार्ट शेपचे लॉकेट आवडत नाही, अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर हे लॉकेट अगदी सहज उठून दिसते.
लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण हे इव्हिल आय लॉकेट घालू शकतात. हे लॉकेट घातल्याने वाईट नजर लागत नाही, असा अनेकांचा विश्वास आहे.
मध्यभागी खडा बसवलेले हे फ्लावर लॉकेट कोणाचेही मन सहज जिंकेल. बॉक्स डिझाईनच्या चेनसोबत हे लॉकेट खूपच आकर्षक दिसते.
लहान लॉकेट घालूनही तुम्हाला स्टायलिश लूक हवा असेल, तर तुम्ही अशा प्रकारच्या डिझाईन्स निवडू शकता. ही लॉकेट्स वजनालाही खूप हलकी असतात.
Biotin Rich Foods : घनदाट आणि मजबूत केसांसाठी खा हे 6 बायोटिनयुक्त पदार्थ
Ghee Health Benefits : रोज सकाळी एक चमचा तूप खाण्याचे 6 जबरदस्त फायदे
Best Fruits For Skin : सुरकुत्या घालवून त्वचा चमकदार बनवणारी 10 फळे, आहारात नक्की घ्या
Dark Chocolate Benefits : डार्क चॉकलेट खाण्याचे ७ भन्नाट फायदे