संगम शहर प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून महाकुंभ २०२५ सुरू होणार आहे. ४५ दिवस चालणाऱ्या या महाकुंभात श्रद्धेने स्नान करण्यासाठी दूरदूरवरून भाविक येणार आहेत.
महाकुंभाच्या मुक्कामासाठी हॉटेल, धर्मशाळा व टेंट सिटीचे ऑनलाइन बुकिंग सुरू आहे. याबाबत सायबर ठगही सक्रिय झाले आहेत. हॉटेल किंवा टेंट सिटी कॉटेज बुकिंगच्या नावाखाली फसवणूक करत आहेत.
यूपी पोलिसांनी बुकिंगच्या नावाखाली होणाऱ्या सायबर फसवणुकीबाबत सावध राहण्याचा इशारा दिला आहे. सोशल मीडिया हँडल एक्सवर व्हिडिओ पोस्ट करून लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे
महाकुंभासाठी येणाऱ्या भाविकांची फसवणूक करण्यासाठी बनावट वेबसाईट तयार करण्यात आल्या आहेत. स्वस्त दरात हॉटेल किंवा कॉटेज बुकिंगचे आमिष दाखवून ते आगाऊ पैसे घेत आहेत.
काही दिवसापूर्वी प्रयागराज पोलिसांनी बनावट वेबसाईटच्या माध्यमातून भाविकांची शिकार करणाऱ्या ४ जणाना पकडले. तंबूनगरीत कॉटेज, हॉटेल्स बुक करण्याच्या नावाखाली ते ऑनलाइन फसवणूक करत होते
महाकुंभासाठी येणाऱ्या भाविकांसाठी यूपी सरकार व प्रशासनाने प्रयागराजमधील नोंदणीकृत हॉटेल, धर्मशाळा व गेस्ट हाऊसची यादी जाहीर केली आहे. त्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन बुकिंग करा.
महाकुंभमेळ्यात भाविकांसाठी टेंट सिटी तयार करण्यात आली आहे. महाकुंभच्या अधिकृत वेबसाइट आणि महाकुंभ ॲपला भेट देऊन तुम्ही ते बुक करू शकता. बुकिंगसाठी पोलिसांच्या सूचनांचे पालन करा.
खोट्या वेबसाइट्स, सोशल मीडियाच्या जाहिरातींच्या फंदात पडू नका. वेबसाइटच्या URL मध्ये 'https' तपासा, वेबसाइटवर फक्त http लिहिले असेल तर उघडू नका. स्वस्त दराच्या आमिषात पडू नका.
ऑनलाइन फसवणूक किंवा समस्या उद्भवल्यास प्रयागराज मेला प्राधिकरण हेल्पलाइन क्रमांक 1920 वर मदत घ्या. राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक 1930 किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार करा.