महाकुंभात पवित्र शुभ मुहूर्तावर PM मोदी प्रयागराजमध्ये दाखल झाले. त्यांच्यासोबत CM योगी आदित्यनाथ, संत-महात्मा, लाखो भाविक उपस्थित होते. संगमाच्या पवित्र तटावर मोदींनी स्नान केलं.
पंतप्रधान मोदींचं विमान बमरौली विमानतळावर उतरले, मोदींनी हेलिकॉप्टरने डीपीएस हेलिपॅडवर पोहोचल्यावर व्हीआयपी घाटावर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेसोबत पोहोचले.
संगमाच्या काठावर पंतप्रधान मोदींना बोटीने पोहोचवण्यात आलं. तिथे पंतप्रधान मोदींनी वैदिक मंत्रोच्चारात गंगेची पूजा केली. हे ऐतिहासिक दृश्य हजारो भाविकांसाठी दिव्य ठरलं.
संगम नाक्यावर पोहोचून मोदींनी ऋषी-मुनींची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. त्याचवेळी, त्यांनी महाकुंभच्या महत्त्वावर आणि भारतीय संस्कृतीवरील त्यांच्या विचारांची देवाणघेवाण केली.
महाकुंभ 2025 मध्ये पंतप्रधान मोदींची ही दुसरी भेट होती. यापूर्वी 13 डिसेंबर 2024 रोजी ते कुंभ नगरीत आले होते आणि संत समाजाशी संवाद साधला होता.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाकुंभ मेळ्यात अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. संगम परिसरात सीआरपीएफ आणि इतर निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहेत.