ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे. हे उद्यान निसर्गप्रेमींसाठी एक स्वर्ग आहे.
तीर्थन व्हॅली त्याच्या शांत सौंदर्यासाठी आणि मासेमारी आणि ट्रेकिंगसारख्या अॅडव्हेंचर गोष्टींसाठी ओखळली जाते. याशिवाय तीर्थन व्हॅली हे निसर्गप्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे.
बिजली महादेव मंदिर 2460 मीटर उंचीवर वसलेले हे प्राचीन मंदिर कुल्लू खोऱ्यात आहे. हे मंदिर वीजेच्या घटनांसाठी प्रसिद्ध आहे.
मणिकरण साहिब त्याच्या गरम पाण्याचे झरे आणि सुंदर गुरुद्वारासाठी ओळखले जाणारे एक आदरणीय तीर्थस्थळ आहे मणिकरण आध्यात्मिक समाधानासाठी पर्यटकांना आकर्षित करते.
नग्गर किल्ला हा ऐतिहासिक किल्ला कुल्लूच्या शाही इतिहास दाखवून देतो.
रघुनाथ मंदिर भगवान रामाला समर्पित एक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक स्थळ आहे. हे मंदिर त्याच्या सुंदर वास्तुकलेसाठी ओळखले जाते.
खीर गंगा हे पार्वती खोऱ्यात स्थित आहे खीर गंगा हे त्याच्या गरम पाण्याचे झरे आणि निसर्गरम्य ट्रेकिंग मार्गांसाठी प्रसिद्ध आहे.
चंदरखानी पास कुल्लू व्हॅली आणि आजूबाजूच्या शिखरांचे विहंगम दृश्ये देणारे एक सुंदर ट्रेकिंग डेस्टिनेशन आहे. जे अॅडव्हेंचर पर्यटकांना आकर्षित करते.
हमता पास हा नयनरम्य पास त्याच्या चित्तथरारक लँडस्केप्ससाठी ओळखला जातो. याशिवाय कुल्लू व्हॅलीला लाहौल व्हॅलीशी जोडणारा एक लोकप्रिय ट्रेकिंग मार्ग आहे.
सोलांग व्हॅली - स्कीइंग आणि पॅराग्लायडिंग सारख्या साहसी खेळांसाठी प्रसिद्ध, सोलांग व्हॅली बर्फाच्छादित पर्वत आणि हिरवळीचे विहंगम दृश्ये देखील देते.