प्रयागराज महाकुंभ २०२५ मध्ये संगम नगरीत जगभरातून भाविक या उत्सवाचा भाग होण्यासाठी गर्दी करत आहेत. त्याचबरोबर नागा संन्याशांचे अद्भुत रूप पाहायला मिळत आहे.
सोमवारी तपोनिधी श्री आनंद अखाडा पंचायतीचा भव्य छावणी प्रवेश झाला. यावेळी नागा संन्याशांची विविध रूपे पाहायला मिळाली.
नागा संन्याशांची साधना आणि भक्तीचा स्तर अद्वितीय आहे. महाकुंभात त्यांची वेगवेगळी रूपे भाविकांना मंत्रमुग्ध करतात.
काही नागा संन्यासी आपल्या संपूर्ण शरीरावर भस्म लावलेले दिसले, तर काही शस्त्रांनी सुसज्ज. तसेच, काही साधू ध्यानस्थ अवस्थेत बसलेले दिसले.
संन्याशांचा हा अनोखा अंदाज केवळ अध्यात्माचे प्रतीक नाही, तर भारतीय संस्कृती आणि परंपरांचेही दर्शन घडवतो. प्रत्येक अखाड्याच्या छावणी प्रवेशात त्यांची उपस्थिती विशेष महत्त्वाची असते.
नागा संन्याशांची अनोखी रूपे आणि अखाड्यांचा भव्य छावणी प्रवेशाची छायाचित्रे या महाकुंभची अद्भुत झलक देतात.
महाकुंभ २०२५ मधील अखाड्यांचा हा भव्य सोहळा भारतीय संस्कृती आणि परंपरेचा उत्सव आहे, जो प्रत्येकासाठी अविस्मरणीय अनुभव ठरत आहे.
संगम नगरीत अध्यात्म आणि संस्कृतीचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळत आहे. या महाकुंभचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे अखाड्यांचा भव्य छावणी प्रवेश आणि नागा संन्याशांचे वेगवेगळे रूप.
एकिकडे पुरुष साधूंची वेगवेगळी रूपे पाहायला मिळत आहेत, तर दुसरीकडे महिला नागा साधूंची झलकही वेगळीच आहे. ज्यांच्या भक्तीची लीला अवर्णनीय आहे.