5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने यावेळी 7 परदेशी खेळाडूंसह 20 खेळाडूंना खरेदी केले असून पाच खेळाडूंना आधीच कायम ठेवण्यात आले आहे.
दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलचे जेतेपद पटकावले नाही, ट्रॉफीच्या शोधात डीसीने केएल राहुल, फाफ डू प्लेसिस, मिचेल स्टार्क सारखे खेळाडू विकत घेतले आहेत. परदेशातील 7 खेळाडूंसह 23 खेळाडू आहेत
यावेळी एलएसजीने सर्वाधिक बोली लावत ऋषभ पंतला आपल्या संघात समाविष्ट केले. त्यांच्या संघात 6 परदेशी खेळाडूंसह एकूण 24 खेळाडू आहेत. तसेच आवेश खान, डेव्हिड मिलर सारखे खेळाडू आहेत.
राजस्थान रॉयल्स संघात 6 परदेशी खेळाडूंसह एकूण 20 खेळाडू आहेत. त्यात जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे, वानिंदू हसरंगा असे खेळाडूही आहेत.
SRH संघात 7 परदेशी खेळाडूंसह एकूण 22 खेळाडू आहेत. त्यात इशान किशन, मोहम्मद शमी, हर्षल पटेल अभिनव, मनोहर या खेळाडूंचाही समावेश आहे.
पंजाब किंग्जने 8 परदेशी खेळाडूंसह 23 खेळाडू खरेदी केले आहेत. 3 खेळाडूंना कायम ठेवण्यात आले. त्याच्या संघात श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल, अर्शदीप, मार्कस स्टॉइनिससारखे खेळाडू आहेत.
शुभमन गिल व्यतिरिक्त गुजरात टायटन्समध्ये 7 परदेशी खेळाडूंसह 20 खेळाडू आहेत. त्याच्या संघात जोस बटलर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णासारखे खेळाडू आहेत.
गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघात 8 परदेशी खेळाडूंसह 21 खेळाडू आहेत. ज्यामध्ये व्यंकटेश अय्यर, एनरिच नॉर्सिया, क्विंटन डी कॉक यांसारख्या बड्या खेळाडूंना विकत घेतले आहे.
5 वेळचा चॅम्पियन एमआयमध्ये रोहित शर्मा आणि 8 परदेशी खेळाडूंसह एकूण 23 खेळाडू आहेत. ज्यामध्ये ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, विल जॅकसारखे दिग्गज खेळाडू आहेत.
लिलावापूर्वी केवळ तीन खेळाडूंना रिटेन करणाऱ्या आरसीबीकडे आता 8 परदेशी खेळाडूंसह एकूण 22 खेळाडू आहेत. ज्यामध्ये जोश हेजलवूड, भुवनेश्वर कुमार यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.