भारतात पर्यटनासह नागरिकांच्या मनोरंजनासाठी मोठमोठे पार्क, गार्डन किंवा वॉटर पार्क्स आहेत. या ठिकाणी मित्रपरिवारासोबत भेट देऊ शकता.
भारतातील सर्वाधिक मोठ्या अम्युजमेंट पार्कपैकी एक वंडरला आहे. हे बंगळुरुमध्ये असून येथे रोलर कोस्टर ते वॉटर स्लाइड्स आहेत. फॅमिली फ्रेंडसोबत येथे जाऊ शकता.
खोपोलीजवळी इमॅजिकाला यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत भेट देऊ शकता. या ठिकाणी मोठ्या वॉटर स्लाइड्स आहेत.
कोलकातामधील प्रसिद्ध वॉटर पार्क म्हणून अॅक्वाटिका ओखळले जाते. येथे मोठ्या वॉटर राइड्सची मजा घेता येईल.
लोणावळ्यात अॅडलॅब्स इमॅजिका मोठे अम्युजमेंट पार्क आहे. येथे वॉटर राइड्सपासून ते वेगवेगळ्या कार्यक्रमांचा मित्रपरिवारासोबत लुटू शकता.
भारतातील दुसरे वंडरला पार्क केरळमध्ये आहे. येथे सर्व वयोगटातील व्यक्तींना प्रवेश दिला जातो.
रामोजी फिल्म सिटी अम्यूजमेंट पार्क असण्यासह भव्य फिल्म स्टुडिओ आहे. येथे सिनेमांशीसंबंधित विविध गोष्टी पहायला मिळतील.
फंटेसिया वॉटर पार्क पटना येथे आहे. येथे स्लाइड्स ते व्हेव पूलची मजा लुटता येईल. समर वेकेशनसाठी हे ठिकाण बेस्ट पर्याय आहे.
स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी प्रसिद्ध असलेल्या क्वीन्स लँडला उन्हाळ्याच्या सुट्टीत भेट देऊ शकता. येथे वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
भारतातील सर्वाधिक जुने अम्युजमेंट पार्क दिल्लीतील अप्पू घर येथे आहे. येथे स्कायफॉल राइडची मजा परिवारासोबत घेता येऊ शकता.