अयोध्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दिवाळी उत्सव साजरा केला जाणार आहे. पर्यावरणपूरक दिव्यांची यावेळी आतिषबाजी केली जाणार आहे.
अयोध्येमध्ये दिवे लावल्यामुळे पर्यावरणाचे कोणतेही नुकसान होणार नाही. हे दिवे पर्यावरणाला लक्षात ठेवूनच खासकरून बनवण्यात आले आहेत.
या दिव्यांमुळे कोणत्याही प्रकारे पर्यावरणाचे नुकसान होणार नाही. यामुळे मंदिराला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.
या दिव्यांमध्ये मोहरीच्या तेलाचा वापर केला जाणार आहे. प्रत्येक दिव्यामध्ये ३० मिलिलिटर मोहरीचे तेल भरले जाणार असून त्याच्यावर कायम लक्ष ठेवलं जाणार आहे.
यावेळी अशा प्रकारे लावलेल्या दिव्यांमुळे एक चांगला संदेश दिला जाईल. पर्यावरणपूरक दिवे लावल्यामुळे चांगला संदेश दिला जाणार आहे.
राम मंदिराला यावेळी विशेष प्रकारच्या दिव्यांनी सुशोभित केले जाणार आहे. त्यामुळे मंदिर प्रकाशाने उजळून निघणार आहे.
अयोध्येतील ५५ घाटांवर २८ लाख दिवे लावले जाणार आहेत. यामध्ये ३०,००० पेक्षा अधिक स्वयंसेवक काम करताना दिसून येतील.