बॉलीवुड दिग्दर्शक विक्रम भट्ट ५६ वर्षांचे झाले आहेत. अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे विक्रम त्यांच्या चित्रपटांसह वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिले.
भट्ट यांचे वैयक्तिक आयुष्य बरेच वादग्रस्त राहिले आहे. त्यांनी बालपणीची मैत्रीण अदिती शी लग्न केले. या जोडप्याचा २०२० मध्ये घटस्फोट झाला. नंतर त्यांनी श्वेतांबरी सोनीशी लग्न केले.
विक्रम भट्टची प्रेमप्रकरणेही कमी नव्हती. त्यांनी सुष्मिता सेनला बराच काळ डेट केले. ब्रेकअपनंतर त्यांचे अमिषा पटेलसोबत प्रेमप्रकरण होते.
अमिषा पटेलला विक्रम भट्टचे प्रेम खूपच महागात पडले. असे म्हटले जाते की या प्रेमप्रकरणामुळे अमिषाच्या आईने तिला चप्पलने मारहाण करून घराबाहेर काढले होते.
विक्रम भट्ट-अमिषा पटेलने एकमेकांना ५ वर्षे डेट केले. नंतर दोन्हीचे नाते तुटले. प्रेमात अपयशी झाल्यानंतर विक्रमने २०२० मध्ये दुसरे लग्न केले.
भट्टचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट गुलाम होता. त्यानंतर त्यांनी राज, आवारा पागल दीवाना, आंखें, स्पीड, १९२०, राज ३डीसह अनेक चित्रपट बनवले. मर्डर ४ याच वर्षी प्रदर्शित होईल.