अभिनेता सैफ अली खान याच्यावर बुधवारी (15 जानेवारी) मध्यरात्री 2 वाजल्याच्या सुमारास चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये सैफ अली खान जखमी झाला आहे.
सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यानंतर मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात सध्या पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.
अज्ञात व्यक्तीने सैफच्या घरात घुसून आणि त्याच्या मोलकरणीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी सैफने हस्तक्षेप केला असता व्यक्तीने अभिनेत्यावर धारधार शस्राने हल्ला केला.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सैफ आणि हल्लेखोरामध्ये झटापट झाली. यावेळी हल्लेखोराने सैफवर चाकूहल्ला केला असता अभिनेता जखमी झाला.
सैफवर झालेल्या हल्ल्यामुळे वांद्रे पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. याशिवाय कठोर सुरक्षितता असताना व्यक्ती घरात घुसला कसा असा प्रश्न उपस्थितीत केला जातोय.