१५ जानेवारीच्या रात्री २.३० वाजता सैफ अली खान यांच्यावर एका अनोळखी व्यक्तीने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांना अनेक ठिकाणी दुखापत झाली आहे.
सैफ अली खान यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या शरीरावर दोन खोल जखमा आहेत. चोरीच्या उद्देशाने ही व्यक्ती त्यांच्या घरी शिरल्याचा अंदाज आहे.
दोन वर्षांपूर्वी म्हणजेच मार्च २०२३ मध्ये शाहरुख खान यांच्या 'मन्नत' बंगल्यातही दोन अनोळखी व्यक्ती शिरल्या होत्या.
दोघेही 'मन्नत'ची भिंत ओलांडून घराच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचले होते. मात्र, सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे त्यांना पकडण्यात आले.
शाहरुख खान यांच्या घरी शिरलेल्या दोघांचे वय २१ आणि २५ वर्षे होते आणि ते गुजरातचे रहिवासी होते.
जेव्हा हे दोघे शाहरुखच्या घरी शिरले तेव्हा किंग खान घरी नव्हते. मात्र, नंतर चौकशीदरम्यान आरोपींनी सांगितले की ते किंग खानना भेटण्यासाठी आले होते.
नुकतेच सलमान खान यांनी त्यांच्या 'गॅलेक्सी अपार्टमेंट'मध्ये बुलेटप्रूफ शीट बसवली आहे. त्यांना सतत हल्ल्याच्या धमक्या येत होत्या.