'12th Fail' फेम विक्रांत मेस्सीने बॉलीवुडमधुन निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्याआधी देखील बरेच कलाकार करीअरमध्ये उंचीवर असताना चित्रपटांपासून दूर झाले आहेत.
विक्रांत मेस्सीने जाहीर केले आहे की तो आता बॉलीवुडमध्ये काम करणार नाही. २०२५ मध्ये त्याचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित होईल.
सलमान खानच्या 'जय हो' सारख्या चित्रपटात दिसलेली सना खानने २०२० मध्ये लग्नामुळे आणि इस्लामसाठी अभिनय सोडून दिला.
'दंगल', 'सीक्रेट सुपरस्टार' सारख्या चित्रपटात दिसलेल्या जायराने २०१९ मध्ये इस्लामच्या मार्गाने जाण्यासाठी बॉलीवुडमधून संन्यास घेतला. 'द स्काय इज पिंक' तिचा शेवटचा चित्रपट होता.
असिनने २०१६ मध्ये राहुल शर्माशी लग्न केले. परंतु एक वर्ष आधीच २०१५ मध्ये तिने चित्रपट सोडले. इंडस्ट्री सोडताना 'गजनी' सारख्या चित्रपटांची ही हिरोईन ३० वर्षांची होती.
तनुश्री २००५ मध्ये चित्रपटात आली व २०१० मध्ये इंडस्ट्रीपासून दूर झाली. तिच्या मते,'हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर तिचे सेक्शुअल हॅरॅशमेंट झाले होते. ज्यामुळे तिला अभिनय सोडणे भाग पडले.
साहिल खानने २००१ मध्ये 'स्टाईल' चित्रपटातून पदार्पण केले होते आणि त्याने २०१० मध्ये चित्रपटापासुन संन्यास घेतला. त्यानंतर त्याने बॉडी बिल्डिंगवर लक्ष केद्रींत केले.
'बेताबी', 'होगी प्यार की जीत' आणि 'बादल' यासारख्या चित्रपटांची हिरोईन मयुरी कांगोने २००९ मध्ये चित्रपटातून संन्यास घेतला. ती पति आदित्य ढिल्लनसोबत न्युयॉर्कला स्थायिक झाली आहे.
ट्विंकल खन्नाची बहीन रिंकी खन्नाने २७व्या वर्षी समीर सरन सोबत लग्न केल्यानंतर एक वर्षाने म्हणजेच २००४ मध्ये चित्रपटातून संन्यास घेतला.
ट्विंकलने २८ व्या वर्षी २००१ मध्ये अक्षय कुमार सोबत लग्न केल्यानंतर चित्रपटांपासून संन्यास घेतला होता. 'लव के लिए कुछ भी करेगा' तिचा शेवटचा चित्रपट होता.
८० आणि ९० दशकातील सुंदर अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्रीने १९९९ मध्ये इंडस्ट्री सोडली आणि पती हरीश मैसुर सोबत वॉशिंग्टन डीसी येथे स्थायिक झाली.