KGF चा अभिनेता यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा आहे. आज ८ जानेवारीला तो त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे.
यशचे वडील बस चालवायचे. त्याला अभिनयाची आवड असल्याने तो खिशात ३०० रुपये घेऊन घरातून पळून गेला. यानंतर त्याने कन्नड टीव्ही मालिका 'नंदा गोकुळा'मधून पदार्पण केले.
यशने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले, त्यानंतर २००८ मध्ये त्याला कन्नड चित्रपट 'मोगीना मनासूमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
'गजकेसरी', 'राजधानी', 'मास्टरपीस' अशा अनेक चित्रपटांनी यशला पुढे नेले. 'KGF Chapter 1' 2018 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटामुळे तो पॅन इंडियाचा सुपरस्टार बनला.
यशला आता रॉकी भाई नावाने ओळखले जाऊ लागले. 'KGF Chapter 2' देखील सुपरहिट ठरला होता, तर त्याच्या पुढच्या भागावर काम देखील लवकरच सुरु होणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यशची चित्रपटाची फी ८० ते १०० कोटींच्या दरम्यान आहे.
यशला नितेश तिवारीच्या रामायणासाठी जवळपास दुप्पट फी ऑफर करण्यात आली आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर रॉकी भाईला या सिनेमासाठी १५० कोटी रुपये मानधन दिले जात आहे.