प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात दर ४ महिन्यांनी ३ हप्त्यांत २-२ हजार रुपये अशी पाठवली जाते.
२४ फेब्रुवारी, २०२५ रोजी पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता जारी होणार आहे. त्याची नोंदणी सुरू आहे. पहिल्यांदाच या योजनेचा लाभ घेण्यासाठी pmkisan.gov.in वर नोंदणी करू शकता.
जर तुम्हाला पीएम किसानचा पुढील हप्ता मिळवायचा असेल आणि अद्याप eKYC केले नसेल, तर लवकर करा. जवळच्या CSC केंद्रावर किंवा पीएम किसान पोर्टल pmkisan.gov.in वर ई-केवाईसी करू शकता.
लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासण्यासाठी pmkisan.gov.in वर जा, Farmers Corner विभागात Beneficiary List मध्ये राज्य, जिल्हा, तालुका, गाव टाकून नाव तपासा.
पीएम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी ईमेल आयडी pmkisan-ict@gov.in, हेल्पलाइन नंबर- १५५२६१ किंवा १८००११५५२६ किंवा ०११-२३३८१०९२ वर संपर्क साधा.