Own Sun Village : स्वतःचा सूर्य बनवणारं गाव... आरशाने आणला प्रकाश, अंधारावर कशी केली मात?

Published : Nov 20, 2026, 04:51 PM IST

Own Sun Village: संपूर्ण जग सूर्योदयानेच जागं होतं. पण, सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही म्हणून... एका गावाने चक्क स्वतःचा कृत्रिम सूर्य तयार केला आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

PREV
13
Own Sun Village

हिवाळ्यात आपल्याला थोडा उशिरा सूर्योदय झाला तरी खूप त्रास होतो. अशात, वर्षातील जवळपास तीन महिने थोडाही सूर्यप्रकाश नसताना कसं असेल? जगात खरंच अशी एखादी जागा असेल का? तर... होय, असं एक गाव आहे. तिथे वर्षातील तीन महिने सूर्याचा प्रकाश अजिबात पोहोचत नाही. अंधारातच जगावं लागतं. पण... त्यांनी या समस्येवर कृत्रिम सूर्याच्या मदतीने उपाय शोधला. ते गाव म्हणजे इटलीमधील विगनेला. इथे सूर्यप्रकाश का पोहोचत नाही? आणि या लोकांची समस्या कोणी सोडवली?

23
तीन महिन्यांचा अंधार

इटलीमधील विगनेला हे गाव एका दरीत वसलेलं आहे. आजूबाजूचे पर्वत हिवाळ्यात सूर्यकिरणांना अडवतात. यामुळे हे गाव वर्षातील जवळपास तीन महिने पूर्ण अंधारात बुडतं. म्हणजेच हिवाळ्यातील तीन महिने त्यांना घनघोर अंधारातच राहावं लागतं. हा अंधाराचा काळ संपून, पुन्हा फेब्रुवारीमध्येच तिथे प्रकाश येतो. प्रकाश आल्याच्या दिवशी तिथले लोक उत्सव साजरे करत. पण, अंधारात असलेल्या त्या तीन महिन्यांत तिथल्या लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागायचा.

33
कृत्रिम सूर्य

थंडी आणि अंधारामुळे येणारा एकटेपणा आणि निराशा दूर करण्यासाठी २००६ मध्ये विगनेलामध्ये एका नाविन्यपूर्ण प्रकल्पाला सुरुवात झाली. आर्किटेक्ट जियाकोमो बोन्झानी (Giacomo Bonzani) यांनी डिझाईन केलेल्या या प्रकल्पासाठी जवळपास १,००,००० युरो खर्चून गावावरील पर्वताच्या शिखरावर एक मोठा आरसा बसवण्यात आला. सूर्याच्या गतीनुसार हा आरसा आपली स्थिती आणि कोन बदलत राहील, याची खात्री एका विशेष सॉफ्टवेअर प्रोग्रामद्वारे केली जाते. यामुळे... त्या गावात दररोज सहा तास सूर्यप्रकाश मिळतो. हा प्रकाश सामान्य सूर्यप्रकाशाएवढा प्रखर नसला तरी... हे गाव आता अंधारात राहिलेलं नाही... या कृत्रिम सूर्याने गावकऱ्यांच्या जीवनात प्रकाश आणला आहे.

जगासाठी आदर्श

विगनेलाने मिळवलेल्या या यशामुळे जगभरातील अनेक भागांना प्रेरणा मिळाली. नॉर्वेच्या र्जुकान दरीसह अनेक ठिकाणी अशा प्रकारचे प्रकल्प उभे राहण्यास यामुळे चालना मिळाली. निसर्गाच्या आव्हानांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने मात करण्याच्या या अद्भुत प्रयत्नाने... जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories