Moscow Bomb Blast : रशियातील मॉस्कोमध्ये बॉम्ब ब्लास्ट; ३ जणांचा मृत्यू, तर २१ जखमी

Published : Aug 02, 2026, 10:16 AM IST
Russia Moscow Bomb Blast

सार

Moscow Bomb Explodes : रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला आहे. या ब्लास्टमध्ये तिघांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी झाले आहे. या घटनेत बॉम्ब घेऊन आलेल्या महिलेचाही मृत्यू झाला आहे.

मॉस्को : रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये शनिवारी १ ऑगस्ट रोजी भीषण बॉम्ब ब्लास्ट झाल्याची घटना घडली आहे. या ब्लास्टमध्ये ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर २१ जण जखमी झाले आहेत. रशियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी मॉस्को शहरातील एका पॉश, महागड्या हॉटेलजवळ बॉम्ब हल्ला झाला. या हॉटेलमध्ये एक खासगी कार्यक्रम सुरू होता. त्या कार्यक्रमात एक महिला बॉम्ब घेऊन पोहोचली होती. हा बॉम्ब घरातच तयार करण्यात आला होता. कार्यक्रमात गेलेल्या महिलेने बॉम्ब ब्लास्ट केल्यानंतर यात तिचाही मृत्यू झाला आहे.

हॉटेलमध्ये कार्यक्रम सुरू असताना बॉम्ब ब्लास्ट

रॉयटर्स वृत्त संस्थेने रशियन एजेन्सी RAI Novostki यांच्या हवाल्याने सांगितलं, की देशाच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी समितीने दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात महिलेला सुरक्षा रक्षकाने अडवलं. ही महिला कुद्रिन्स्काया चौकातील 'बाल्झी रॉसी' या हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळेच तिला सुरक्षारक्षकाने अडवलं. त्या महिलेकडे एक आयईडी कार्ड होतं. त्या कार्डचा हॉटेलमध्ये ती महिला जाण्याआधीच स्फोट झाला. या स्फोटात त्या महिलेसह तिला अडवणारा सुरक्षा रक्षक आणि तेथील एका ग्राहकाचा मृत्यू झाला आहे. महिलेने नेमका बॉम्ब का आणला? यामागे तिचा उद्देश काय होता? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अनुत्तरीत आहेत.

तसंच ही महिला कोण होती, याबाबत तिची अद्याप ओळख पटलेली नाही. महिला हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी झालेला हा स्फोट गॅस सिलेंडरचा स्फोट असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र चौकशीदरम्यान रशियन दहशतवादविरोधी समितीने हा गॅस सिलेंडरचा स्फोट नसून हा आयईडी बॉम्ब स्फोट असल्याची माहिती दिली आहे.

रिमोटद्वारे बॉम्ब घडवल्याचा अंदाज

ज्या हॉटेलबाहेर स्फोट झाला, त्या हॉटेलमध्ये एक कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमातील लोकांना, पाहुण्यांना बॉम्ब स्फोटात लक्ष्य करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. कार्यक्रमासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. एका सुरक्षा रक्षकाने तिला वेळीच अडवलं, अन्यथा या स्फोटात आणखी अनेकांचा मृत्यू झाला असल्याची भीती होती.

महिलेला देखील बॉक्समध्ये नेमकं काय आहे याचा अंदाज नसावा

महिला जी हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होती, तिच्याकडे एक बॉक्स होता. तो बॉक्स पाहून सुरक्षारक्षकाला संशय आला. त्यामुळे त्याने महिलेला बॉक्सबद्दल विचारणा केली. पण तिने यात गिफ्ट असल्याचं सांगितलं. सुरक्षारक्षकाने तो बॉक्स तपासण्यासाठी उघडला आणि तिथेच स्फोट झाला. तो बॉक्स अर्थात बॉक्समध्ये असलेला बॉम्ब रिमोटद्वारे त्याचा स्फोट घडवला असल्याचा अंदाज आहे. तसंच महिलेला त्या बॉक्समध्ये नेमकं काय आहे? याची माहिती नसावी असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र कडक सुरक्षा असतानाही महिलेने हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि घडवलेल्या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

AI E-Waste : एआयच्या वेगामुळे जगात ई-कचऱ्याचा डोंगर उभा राहणार
China Parking Dispute : चिनी महिलेने स्वस्तात खरेदी केले 196 पार्किंग स्पॉट्स, आता 80% नफ्याने विकतेय