US Iran Conflict : अमेरिका-इराण वादात पाकिस्तानची एन्ट्री? इस्लामाबादमध्ये चर्चेची तयारी

Published : Mar 25, 2026, 07:52 AM IST
Pakistan Offers to Mediate US Iran Talks Amid Regional Tensions

सार

Pakistan Offers to Mediate US Iran Talks Amid Regional Tensions : मध्य पूर्वेतील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानने अमेरिका आणि इराणमध्ये मध्यस्थी करण्याची तयारी दाखवली आहे.

Pakistan Offers to Mediate US Iran Talks Amid Regional Tensions : मध्य पूर्वेतील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तान आता पुढे सरसावला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी करण्याची भूमिका पाकिस्तान घेऊ शकतो, असं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. याला दुजोरा देत पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी इस्लामाबादमध्ये अमेरिका-इराण शांतता चर्चेचं आयोजन करण्यास आम्ही तयार आहोत, असं जाहीर केलं आहे.

पाकिस्तानचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चांगले संबंध आहेत, तर दुसरीकडे इराणशीही त्यांचे जुने नाते आहे. याच गोष्टीचा फायदा घेऊन पाकिस्तान मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी रविवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. तर पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी सोमवारी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी संवाद साधला. याच दरम्यान ट्रम्प यांनी ५ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे, हे विशेष.

पाकिस्तानला मध्यस्थी का करायची आहे?

आखाती देशांमध्ये ऊर्जेच्या पायाभूत सुविधांवर होणारे हल्ले पाकिस्तानसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत. कारण भारताप्रमाणेच पाकिस्तानही मध्य पूर्वेतील गॅस आणि पेट्रोल-डिझेलवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.

युद्ध आता धोकादायक वळणावर पोहोचल्यामुळे पाकिस्तानमध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. देशात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे इंधन वाचवण्यासाठी शाळा बंद करणे आणि कार्यालयांना वर्क फ्रॉम होम देण्यासारखे कठोर निर्णय घेण्याकडे पाकिस्तानचा कल आहे. अगदी कोरोना काळात जसे निर्बंध होते, तसे पाऊल उचलण्याचा विचार सरकार करत आहे. अनेक क्रीडा स्पर्धाही रद्द झाल्यामुळे या युद्धाचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे, असं सूत्रांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानच्या मध्यस्थीवर अमेरिकेची प्रतिक्रिया नाही

वॉशिंग्टन: 'पाकिस्तान अमेरिका आणि इराणमध्ये मध्यस्थी करत आहे' या वृत्तांवर प्रतिक्रिया देण्यास व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लीविट यांनी नकार दिला आहे. 'आम्ही वृत्तपत्रांमधून वाटाघाटी करत नाही. काही घोषणा करायची असेल, तर व्हाईट हाऊस स्वतः करेल. आम्ही अशा चर्चांना किंवा अफवांना महत्त्व देत नाही,' असं त्यांनी स्पष्ट केलं.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

नवरा गुपचूप करायचा असले काम, 20 वर्षांनी सत्य कळताच बायकोने दिला घटस्फोट!
Plane Crash : कोलंबियामध्ये लष्करी विमान कोसळले, 110 सैनिक होते स्वार, टेकऑफवेळीच मोठी दुर्घटना