अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांच्यात घटुली होणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.
न्यूयॉर्क (अमेरिका): अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांच्यात घटुली होणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. येत्या सोमवारी होणाऱ्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला मिशेल अनुपस्थित राहणार असल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. पती ओबामा उपस्थित असलेल्या अधिकृत कार्यक्रमांना मिशेल गैरहजर राहण्याची ही या महिन्यातली दुसरी वेळ आहे.
याआधी याच महिन्यात झालेल्या अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्या अंत्यसंस्कारालाही बराक ओबामा एकटेच आले होते. जिमी कार्टर यांच्या अंत्यसंस्कारालाही मिशेल अनुपस्थित होत्या. यापूर्वीही दोघांनी विविध मुद्द्यांवरून मतभेद असल्याचे संकेत दिले होते.
बराक ओबामा हे व्हाइट हाऊसचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष होते. १९८९ मध्ये एका कायदा कंपनीत बराक ओबामा आणि मिशेल यांची भेट झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. मैत्रीचे प्रेमात रूपांतर होण्यास वेळ लागला नाही. एकमेकांवर प्रेम करणारे बराक ओबामा आणि मिशेल १९९२ मध्ये विवाहबंधनात अडकले. या दांपत्याला मलिया आणि साशा अशा दोन मुली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत आहेत.
बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल यांनी याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नाही. या चर्चाबाबतही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, दोघांच्या घटस्फोटाबाबत लोकांमध्ये उत्सुकता असल्याचे दिसून येत असून, ते दोघांचे फोटो विविध कॅप्शनसह शेअर करत आहेत.