New Technology Side effects : ChatGPT सारख्या AI टूल्सच्या अतिवापरामुळे तुमची स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता कमी होऊ शकते, असा इशारा नवीन संशोधनातून देण्यात आला आहे. मेंदूची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्याल, हे जाणून घेऊया.
आजच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. ऑफिसच्या कामापासून ते विद्यार्थ्यांच्या होमवर्कपर्यंत, प्रत्येक गोष्टीसाठी आपण ChatGPT आणि Gemini सारख्या AI टूल्सवर अवलंबून राहू लागलो आहोत. पण हे तंत्रज्ञान आपल्या मेंदूच्या क्षमतेवर गंभीर परिणाम करत आहे, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
25
मेंदूवर नकारात्मक परिणाम
ब्राझीलच्या फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ रिओ दी जानेरोने केलेल्या एका ताज्या स्टडीनुसार, AI टूल्सच्या अतिवापराचा मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो. प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी ChatGPT सारख्या AI टूल्सवर अवलंबून राहिल्यामुळे मेंदूची नैसर्गिक विचार प्रक्रिया थांबते. यामुळे नवीन गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता हळूहळू कमी होते, असं संशोधकांना आढळलं आहे.
35
मेंदूची क्रियाशीलता घटते
या संशोधनात शास्त्रज्ञांनी विद्यार्थ्यांच्या मेंदूच्या कार्यपद्धतीचं निरीक्षण केलं. जे विद्यार्थी असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी फक्त AI किंवा ChatGPT वर अवलंबून होते, त्यांच्या मेंदूची क्रियाशीलता घटत असल्याचं दिसून आलं. याउलट, जे विद्यार्थी स्वतः अभ्यास करत होते, त्यांचा मेंदू जास्त सक्रिय होता. AI मुळे विद्यार्थी विश्लेषण करण्याची क्षमता गमावत आहेत, अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटी आणि मायक्रोसॉफ्टने मिळून केलेल्या एका संशोधनातून आणखी काही रंजक गोष्टी समोर आल्या आहेत. जर एखादी व्यक्ती प्रत्येक छोट्या समस्येसाठी AI वर अवलंबून राहिली, तर कालांतराने त्या व्यक्तीची समस्या सोडवण्याची क्षमता कमकुवत होते. मेंदूला चालना न देता यंत्रांकडून उत्तरं मिळवल्यामुळे भविष्यात गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.
55
अंगभूत कौशल्यांवर विपरित परिणाम
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने ब्रिटनमधील शालेय मुलांवर केलेल्या सर्वेक्षणाचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या १० पैकी ६ विद्यार्थ्यांनी (६०%) AI टूल्समुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होत असल्याचं मत मांडलं. AI मुळे कामं लवकर होत असली तरी, त्यांची स्वतःची कौशल्ये आणि शिकण्याची क्षमता कमी होत असल्याचं त्यांनी मान्य केलं.