'इराणला संपवून टाकू', ट्रम्प यांच्या या धमकीनंतर वीज केंद्रांभोवती मानवी साखळी उभारणार इराणचे नागरिक

Published : Apr 07, 2026, 09:47 AM IST
Iran Urges Citizens to Form Human Chains

सार

Iran Urges Citizens to Form Human Chains : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला संपवण्याची धमकी दिल्यानंतर, इराणचे मंत्री अलीरेझा राहिमी यांनी देशातील नागरिकांना वीज केंद्रांभोवती मानवी साखळी तयार करण्याचे आवाहन केले आहे.

Iran Urges Citizens to Form Human Chains : "होरमुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) उघडली नाही, तर इराणला संपवून टाकू," अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. या धमकीनंतर, इराणचे क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्रालयाचे उपमंत्री अलीरेझा राहिमी यांनी देशातील नागरिकांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय. त्यांनी देशातील तरुण, कलाकार आणि खेळाडूंना वीज केंद्रांभोवती (Power Plants) दुपारी २ वाजता मानवी साखळी तयार करण्यास सांगितलं आहे.

अमेरिकेने वीज केंद्रांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर बॉम्ब टाकण्याची धमकी दिली आहे. याविरोधात निषेध म्हणून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. अलीरेझा राहिमी यांनी सोशल मीडियावर लिहिलंय की, 'सार्वजनिक मालमत्तेवर हल्ला करणे हा युद्ध गुन्हा आहे, हे जगाला सांगण्यासाठी आपण हातात हात घालून उभे राहू.'

इराणने आपल्या नागरिकांना ७ एप्रिल रोजी हे आंदोलन करण्यास सांगितलं आहे. अमेरिकेने दिलेल्या मुदतीनंतर होरमुझची सामुद्रधुनी पूर्णपणे उघडली नाही, तर इराणमधील पूल आणि वीज केंद्रांवर हल्ले करू, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती. याच पार्श्वभूमीवर इराणने लोकांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं आहे. या प्रदेशात तणाव वाढत असल्याने, हे आंदोलन मोठं स्वरूप धारण करू शकतं, असं मानलं जातंय.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Australia Viral Video: लग्नात पावसाचा कहर, पाहुण्यांनी खुर्च्यांनी पेललं छत!
Meta Muse Spark AI: गणितातली ती ६ रहस्यं मेटाच्या AI ने खरंच सोडवली का?