खमेनींच्या इशाऱ्यानंतर इराणची कारवाई, सुरक्षेच्या कारणास्तव होरमुझ सामुद्रधुनी अंशतः बंद

Published : Feb 18, 2026, 08:19 AM IST
Iran Conducts Military Drill Closes Strait of Hormuz Amid US Talks

सार

Iran Conducts Military Drill Closes Strait of Hormuz Amid US Talks : इराणच्या एलिट रिव्होल्युशनरी गार्ड्सने सामुद्रधुनीच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागली असून, सुरक्षेच्या कारणास्तव जलमार्गाचा काही भाग तात्पुरता बंद करण्यात आला.

Iran Conducts Military Drill Closes Strait of Hormuz Amid US Talks : अमेरिकेसोबत जिनेव्हामध्ये महत्त्वपूर्ण अणुकरार चर्चा सुरू असताना, इराणने होरमुझच्या सामुद्रधुनीमध्ये अनपेक्षित लष्करी सराव केला आहे. इराणच्या एलिट रिव्होल्युशनरी गार्ड्सने सामुद्रधुनीच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागली असून, सुरक्षेच्या कारणास्तव जलमार्गाचा काही भाग तात्पुरता बंद करण्यात आल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी म्हटले आहे.

इराणच्या किनारपट्टी आणि जहाजांवरून डागलेली क्षेपणास्त्रे होरमुझ सामुद्रधुनीतील निश्चित लक्ष्यांवर अचूकपणे आदळली, असे इराणच्या तस्निम वृत्तसंस्थेने म्हटले आहे. मंगळवारी काही तासांसाठी जहाजांच्या सुरक्षेच्या दृष्टीने होरमुझ सामुद्रधुनीचा काही भाग बंद ठेवण्यात आला होता. हा जगातील २० टक्के तेल पुरवठा करणारा मार्ग आहे. जिनेव्हामध्ये ओमानच्या मध्यस्थीने ओमानच्या राजदूतांच्या निवासस्थानी ही चर्चा होत आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची आणि अमेरिकेचे प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ व जेरेड कुशनर यांच्यात अप्रत्यक्ष चर्चा झाली.

चर्चा अधिक सकारात्मक झाली असून काही सामान्य तत्त्वांवर एकमत झाले आहे, असे अब्बास अरागची यांनी स्पष्ट केले. मात्र, लगेचच कोणताही करार होऊ शकणार नाही, असेही त्यांनी जोडले. राजनैतिक चर्चा अयशस्वी झाल्यास लष्करी कारवाई केली जाईल, असे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. याला प्रत्युत्तर म्हणूनच होरमुझमधील हा लष्करी सराव पाहिला जात आहे. 'युद्धनौका धोकादायक आहेत, पण त्यांना समुद्राच्या खोलवर बुडवू शकणारी शस्त्रे त्याहूनही अधिक धोकादायक आहेत,' असा इशारा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी दिला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

भारत-बांगलादेश संबंधात मोठी घडामोड, नरेंद्र मोदींचे तारिक रहमान यांना भेटीचे निमंत्रण
इराणचा पराभव शक्य नाही, अमेरिकेचे सैन्य नष्ट करण्याची ताकद आमच्यात -अयातुल्ला खामेनेई