India Israel Relations : जगाला भरली धडकी? भारत इस्रायलच्या सुरक्षा गटात सामील होणार? मोदींच्या दौऱ्यात मोठ्या घडामोडी

Published : Feb 26, 2026, 09:11 AM IST
India Israel Relations

सार

India Israel Relations : पंतप्रधान मोदी सध्या इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत. इस्रायलच्या नेतृत्वाखाली एका नव्या सुरक्षा गटात भारत सामील होण्याची शक्यता आहे. या गटात काही अरब देशांचाही समावेश असेल, असं इस्रायलने स्पष्ट केलंय.

India Israel Relations : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत आणि एक मोठी बातमी समोर येत आहे. इस्रायलच्या पुढाकाराने तयार होणाऱ्या एका सुरक्षा गटात भारत आज सामील होऊ शकतो, असं बोललं जातंय. इस्रायलने स्पष्ट केलं आहे की, या गटात काही अरब देशांचाही समावेश असेल. इस्लामिक कट्टरतावादाचा सामना करणं हे या सुरक्षा गटाचं मुख्य उद्दिष्ट आहे.

या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये लष्करी तंत्रज्ञान वाटून घेण्यावरही करार होऊ शकतो. इस्रायल भारताला 'आयर्न डोम' (Iron Dome) सारखं प्रगत तंत्रज्ञान देऊ शकतं, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इस्रायल दौरा सध्या सुरू आहे.

इस्रायलमध्ये दाखल झाल्यावर पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत विशेष चर्चा केली. आज भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता पंतप्रधान मोदी इस्रायलच्या संसदेला, म्हणजे 'नेसेट'ला (Knesset) संबोधित करतील. गुरुवारी दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. या चर्चेत लष्करी आणि व्यापारी क्षेत्रातील सहकार्यासाठी काही महत्त्वाच्या करारांवर सह्या केल्या जातील. स्वतंत्र पॅलेस्टाईन राष्ट्राच्या भूमिकेचा भारत चर्चेत पुनरुच्चार करेल, असं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे. इराणसोबत तणावपूर्ण परिस्थिती असली तरी, पंतप्रधानांच्या दौऱ्यात कोणताही बदल होणार नाही.

मात्र, पंतप्रधानांच्या या इस्रायल दौऱ्यावर काँग्रेसने टीका केली आहे. पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्याचं भारताचं जुनं धोरण पूर्णपणे सोडून मोदी इस्रायलला गेले आहेत, असा आरोप काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख जयराम रमेश यांनी केला आहे. बेंजामिन नेतन्याहू पॅलेस्टिनी नागरिकांवर अत्याचार करत असताना, नरेंद्र मोदींचा हा दौरा त्याला एकप्रकारे मान्यता देणारा आहे, असंही काँग्रेसने म्हटलं आहे.

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Brazil Train Accident: ब्राझीलमध्ये रेल्वे रुळावर पडलेल्या क्रेनला ट्रेनची धडक, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
Live TV Broadcast: लाईव्ह रिपोर्टिंग करताना पत्रकाराला समुद्राच्या लाटेने उडवलं, पाहा थरारक व्हिडिओ