३.८४ कोटींचे स्वप्नगृह, पण खिडकी उघडली तर...

दीर्घ प्रतीक्षेनंतर एका दाम्पत्याने ३.८४ कोटी रुपये खर्च करून चार बेडरूमचे घर खरेदी केले. नवीन घरात नवीन जीवन जगण्याची स्वप्ने पाहत आलेल्या त्यांना मात्र तिथे काही वेगळेच अनुभव आले. 

पल्या आवडीचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी लोक सोयीसुविधा कमी करून, कर्ज काढून पैसे जमवण्याचा प्रयत्न करतात. खूप कष्ट आणि त्यागानंतर जेव्हा घर बांधून पूर्ण होते, किंवा खरेदी करून तिथे राहायला जातात तेव्हा काय होईल जर ते घर राहण्यायोग्यच नसेल? हो, असाच अनुभव ब्रिटनमधील वॉल्टर ब्राउन आणि त्यांची पत्नी शेरोन केली यांना आला. 

नुकच वॉल्टर आणि शेरोन यांनी ब्रिटनमधील कॉलरटन येथे चार बेडरूमचे घर खरेदी केले. ३,५८,००० पौंड म्हणजेच सुमारे ३.८४ कोटी रुपयांना त्यांनी हे घर घेतले. पण नवीन घरात राहण्याचे त्यांचे स्वप्न लवकरच भंगले. त्याचे कारण म्हणजे बेडरूममधून दिसणारा एक दृश्य. सुंदर घराच्या आजूबाजूला सुंदर निसर्ग असेल अशी अपेक्षा करत खिडकी उघडताच त्यांना दिसले तेथील कचऱ्याचे ढीग. तेही एकरावर पसरलेले. त्यांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार करून कचरा हटवण्याची विनंती केली पण काहीच उपयोग झाला नाही. 

खिडक्या बंद केल्या तरी कचऱ्याच्या ढिगांमधून येणारा दुर्गंध असह्य होत असे. त्यामुळे घरात बसणेही कठीण झाले होते असे वृत्तात म्हटले आहे. वॉल्टर यांनी प्रॉपर्टी डेव्हलपरकडे कचरा हटवण्याची विनंती केली. ते हटवण्याचे आश्वासन मिळाले पण महिने उलटून गेले तरी काहीच झाले नाही. शिवाय तेथील रस्तेही खराब होते. इतक्या मोठ्या रकमेत घर घेणे चुकीचे होते असे आता त्यांना वाटते. घर खरेदी करताना आजूबाजूचा परिसर तपासणेही महत्त्वाचे आहे असे ते म्हणतात. 

Share this article