Donald Trump Attack News : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, 20 वर्षीय थॉमस मॅथ्यू हल्लेखोराचे नाव

Published : Jul 14, 2024, 02:27 PM IST
Thomas Mathew

सार

Donald Trump Attack News : हल्लेखोराने साधारणपणे 120 मीटर अंतरावरून ट्रम्प यांच्यावर गोळी झाडली होती. अमेरिकन तपास यंत्रणा या हल्ल्याकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न म्हणून बघत आहेत.

Donald Trump Attack News : अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. घटनास्थळी सुरक्षेत तैनात असलेल्या यूएस सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी त्याला जागीच ठार केले आहे. मात्र आता तो कोण होता आणि कोठे रहायचा? या संदर्भातील माहिती समोर आली आहे. हल्लेखोराने साधारणपणे 120 मीटर अंतरावरून ट्रम्प यांच्यावर गोळी झाडली होती. अमेरिकन तपास यंत्रणा या हल्ल्याकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न म्हणून बघत आहेत.

कोण आणि कुठला रहिवासी होता हल्लेखोर?

थॉमस मॅथ्यू क्रुक्स असे हल्लेखोराचे नाव होते. तो 20 वर्षांचा होता आणि पेनसिल्व्हेनियातील बेथेल पार्क येथील रहिवासी होता. बेथेल पार्क बटलरपासून साधारणपणे 40 मैल दक्षिणेला आहे. घटनास्थळावरून एक AR-15 सेमी-ऑटोमॅटिक रायफल जप्त करण्यात आली आहे. बहुदा याच रायफलच्या सहाय्याने तरुणाने डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या रॅलीवर गोळीबार केला. यानंतर, यूएस सीक्रेट सर्व्हिसने प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत हल्लेखोराच्या डोक्याला गोळी लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

हल्लेखोराने व्यासपीठापासून 120 मीटर अंतरावरून केला गोळीबार

डोनाल्ड ट्रम्प ज्या व्यासपीठावरून भाषण देत होते, त्या व्यासपीठापासून 120 मीटर अंतरावर असलेल्या एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या छतावरून हल्लेखोराने गोळीबार केला. बटलर फार्म शोग्राऊंडवर डोनाल्ड ट्रम्प यांचे ओपन-एअर कँपेन आयोजित करण्यात आली होती. येथे एवढी मोकळी जागा होती की, स्नायपरला निशाणा साधण्यात कसल्याही प्रकारची अडचण आली नाही. हल्लेखोर आपल्या जागेवरून ट्रम्प यांना कुठल्याही अडथळ्याशिवाय स्पष्टपणे बघू शकत होता.

न्यूयॉर्क पोलिसांनी शनिवारी (13 जुलै) या घटनेनंतर, ट्रम्प टॉवरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अमेरिकन तपास यंत्रणा या हल्ल्याकडे ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न म्हणून बघत आहेत. त्या अनुषंगानेच तपास सुरू आहे. तसेच, वर्दीधारी अधिकारी आणि एक पोलीस डॉग मॅनहट्टनच्या फिफ्थ एव्हेन्यूवर इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर गस्त घालत आहेत.

आणखी वाचा : 

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, 'माझ्या मित्रावर झालेल्या हल्ल्याबद्दल मी अत्यंत चिंतेत

'मी अनेक गोळ्यांचे आवाज ऐकले ...' ट्रम्प गोळीबाराचे ते भयावह क्षण, त्यांना पाहून घबराट निर्माण झाली

अमेरिका: डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीमध्ये दोन ठार, माजी राष्ट्राध्यक्षांच्या चेहऱ्यावर दिसले रक्ताचे डाग

 

PREV
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Live TV Broadcast: लाईव्ह रिपोर्टिंग करताना पत्रकाराला समुद्राच्या लाटेने उडवलं, पाहा थरारक व्हिडिओ
Mountaineer Period Hack: १६,००० फुटांवर मासिक पाळी आली, गिर्यारोहक तरुणीने टिश्यू पेपरचा बनवला पॅड