मुंबई - चीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप प्रगती करत आहे. दळणवळणाच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल करत आहे. चीनने आता आणखी एक चमत्कार केला आहे. ६०० किमी प्रतिसास धावणारी रेल्वे आणली आहे. या ट्रेनने तुम्ही मुंबई ते पुणे अंतर केवळ १० मिनिटांत पार करु शकता.
चीनने पुन्हा एकदा जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. हायस्पीड रेल्वे व्यवस्थेत आधीच आघाडीवर असलेल्या या देशाने आता ताशी ६०० किलोमीटर वेगाने धावणारी 'माग्लेव्ह' रेल्वे भव्यदिव्य स्वरूपात सादर केली आहे. १७ व्या आधुनिक रेल्वे प्रदर्शनात हा तांत्रिक चमत्कार लोकांसमोर आणण्यात आला.
25
७ सेकंदात ६०० किमी/तास वेग
ही 'माग्लेव्ह' रेल्वे केवळ ७ सेकंदातच ताशी ६०० किलोमीटरचा कमाल वेग गाठते. हे शक्य होण्यासाठी मॅग्नेटिक लेव्हिटेशन तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावते. रेल्वे ट्रॅकला न स्पर्शता, चुंबकीय बलाने तरंगत असल्याने घर्षण न होता ती अतिशय वेगाने प्रवास करते. अधिकाऱ्यांच्या मते, बीजिंग ते शांघाय हे १२०० किलोमीटरचे अंतर केवळ १५० मिनिटांत पार करता येईल. आतापर्यंत तेच अंतर पार करण्यासाठी कमीत कमी ५.३० तास लागतात.
35
जराही धक्के बसत नाहीत
डोंघू प्रयोगशाळेतील संशोधकांनी २०२५ च्या अखेरीस 'माग्लेव्ह' ट्रॅकचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. रेल्वे पूर्णपणे एआय आधारित सस्पेंशन तंत्रज्ञानावर चालते. विद्युतचुंबकीय नियंत्रण प्रणालीमुळे प्रवास करत आहोत ही जाणीवही होत नाही. रेल्वेला जराही धक्के बसत नाहीत.
ही 'माग्लेव्ह' रेल्वे आधीच जगातील सर्वात वेगवान रेल्वे म्हणून ओळखली जाते. तिचे वजन १.१ टन आहे आणि गेल्या जूनमध्ये तिची पहिली चाचणी यशस्वी झाली. आता लोकांसमोर सादरीकरण करून चीनने पुन्हा एकदा आपले तंत्रज्ञान सर्वोच्च पातळीवर असल्याचे सिद्ध केले आहे.
55
मुंबई-पुणे अंतर केवळ एका तासात
अशी सुपर स्पीड रेल्वे भारतात आली तर रेल्वे क्षेत्रात क्रांतिकारी बदल होतील. उदाहरणार्थ, मुंबई ते पुणे अंतर रस्त्याने गेलात तर १५२ किमी आहे. तर विमानाने गेलात तर ११८ किलोमीटर आहे. ही रेल्वे समृद्धी महामार्गासाराखी सरळ रेषेत धावली तर हे अंतर सुमारे १०० किलोमीटरच्या आसापास येईल. म्हणजेच या रेल्वेला मुंबईहून सुटल्यावर पुणे गाठायला केवळ १० मिनिटे लागतील.
सध्या भारतात पहिल्या बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे ही 'माग्लेव्ह' रेल्वे भारतात येण्यासाठी कमीत कमी पंचवीस वर्षे लागतील यात शंका नाही.