या व्हिडिओवर अनेकांनी गमतीदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'बासमती तांदळाची पिशवी असताना गुच्ची बॅगची काय गरज?' अशी एका व्यक्तीची प्रतिक्रिया होती.
सोशल मीडियावर आपल्याला अनेक गमतीदार गोष्टी पाहायला मिळतात. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील चित्रं, व्हिडिओ आणि फॅशन ट्रेंड आपल्यासमोर येतात. सध्या अमेरिकेतून एक असाच गमतीदार ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तांदळाची पिशवी घेऊन आपण जवळच्या दुकानातही जात नाही, नाही का? त्याऐवजी आपण चांगली बॅग घेण्याचा प्रयत्न करतो. सुपरमार्केटमध्ये तांदळाच्या पिशवीने जाणार का? कुठे? पण अमेरिकेत एका युवतीने तांदळाची पिशवी घेऊन सलूनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण या राईस बॅग्ज काही साध्यासुध्या नाहीत. रॉयल बासमती राईस बॅग्ज वेगवेगळ्या किमतीत उपलब्ध आहेत.
इंस्टाग्राम युजर अमांडा जॉन मंगलाथ यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. एक युवती बासमती राईस बॅग घेऊन सलूनमध्ये गेली आहे. ती अगदी मॉडर्न लूकमध्ये दिसत आहे.
'अमेरिकेतील सध्याचा ट्रेंड तुम्ही पहा. तो तुम्हाला सहज मिळू शकतो. हा ट्रेंड भारतात कमी किमतीत सहज उपलब्ध आहे,' असे कॅप्शन अमांडाने व्हिडिओला दिले आहे.
अमांडाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक युवती बासमती राईस बॅग खांद्यावर घेऊन सलूनमध्ये उभी असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी गमतीदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'बासमती तांदळाची पिशवी असताना गुच्ची बॅगची काय गरज?' अशी एका व्यक्तीची प्रतिक्रिया होती. 'शेवटी, जागतिक फॅशनमध्ये धाडस करण्यासाठी एक भारतीय निर्यात!', अशी दुसऱ्या एका व्यक्तीची प्रतिक्रिया होती.