Apple Anniversary: ॲपल कंपनी लवकरच 50 वर्षं पूर्ण करत आहे. एका गॅरेजमध्ये सुरू झालेल्या या कंपनीचा ॲपल II पासून ते आयफोनपर्यंतचा थक्क करणारा प्रवास आणि सीईओ टिम कूक यांनी शेअर केलेल्या खास गोष्टी जाणून घ्या.
'तंत्रज्ञान वैयक्तिक असायला हवं' या साध्या ध्येयाने सुरू झालेला हा प्रवास आज 2.5 अब्ज लोकांच्या आयुष्याचा भाग बनला आहे. ॲपल II पासून ते आजच्या आयफोन, मॅकबुक आणि व्हिजन प्रो पर्यंतचा ॲपलचा विकास म्हणजे फक्त उत्पादनांची रांग नाही, तर मानवी जीवनातील क्रांती आहे.
24
महत्त्वाची उत्पादने
टिम कूक यांनी आपल्या पत्रात ॲपलच्या 50 वर्षांच्या इतिहासातील अनेक महत्त्वाच्या उत्पादनांची आठवण करून दिली. पर्सनल कॉम्प्युटर क्षेत्रात क्रांती घडवणारा मॅकिन्टॉश (Macintosh), संगीत ऐकण्याची पद्धत बदलणारा आयपॉड (iPod) आणि संपूर्ण दूरसंचार जगताला हादरवून सोडणारा आयफोन (iPhone), या प्रत्येकाने एक इतिहास घडवला. 'आम्ही कालच्या आठवणींपेक्षा उद्याच्या निर्मितीवर जास्त लक्ष केंद्रित करतो,' असं टिम कूक म्हणतात. ॲपलच्या यशाचं श्रेय ते ग्राहक आणि डेव्हलपर्सना देतात.
34
'Think Different' - आजही कंपनीचा आत्मा!
९० च्या दशकात ॲपलने दिलेला 'थिंक डिफरेंट' (Think Different) हा नारा आजही कंपनीचा आत्मा आहे. 'जे लोक जगाला बदलण्याचं वेड बाळगतात, तेच खरंतर जग बदलतात,' या प्रसिद्ध ओळींनी टिम कूक यांनी आपल्या पत्राचा शेवट केला आहे. बंडखोर, नवीन वाटा तयार करणारे आणि इतरांपेक्षा वेगळा विचार करणाऱ्यांसाठी ॲपल नेहमीच काम करत राहील, हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.
भविष्याबद्दल बोलायचं झाल्यास, ॲपल कंपनी स्वतःच्या सिलिकॉन चिप्स (Apple Silicon), आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Apple Intelligence) आणि पर्यावरण संरक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. त्यामुळे पुढची 50 वर्षे आणखी जबरदस्त तंत्रज्ञानाने भरलेली असतील यात शंका नाही.