Budget 2025: केंद्र सरकारची ऐतिहासिक घोषणा, 36 जीवनरक्षक औषधे ड्युटी फ्री

अर्थसंकल्पात आरोग्य, शिक्षण, शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्यात. ३६ जीवनरक्षक औषधे ड्युटी फ्री, कॅन्सर डे केअर सेंटरची स्थापना, वैद्यकीय शिक्षणासाठी १०,००० जागांची वाढ, IIT आणि AI शिक्षणासाठी ६५०० जागा, ३ नवीन AI सेंटर, शेतकऱ्यांसाठी योजना अशा केल्यात.

2025 चा केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये सरकारने गरीब आणि गरजू लोकांसाठी दिलासा देणारी अनेक उपाययोजना जाहीर केली आहेत. या बजेटमुळे रुग्ण, शेतकरी, महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यासोबतच शिक्षण क्षेत्रातही सरकारने खूप मोठे पाऊल टाकले आहे.

आणखी वाचा : अर्थसंकल्प २०२४: शेतकऱ्यांसाठी 'धन धन्य' योजना जाहीर

36 जीवनरक्षक औषधे ड्युटी फ्री

केंद्र सरकारने आज एक महत्त्वाची घोषणा केली. गंभीर आजारासाठी लागणाऱ्या 36 जीवन रक्षक औषधांवर ड्युटी टॅक्स पूर्णपणे रद्द केला आहे. यामुळे या औषधांची किंमत कमी होणार आहे आणि रुग्णांना उपचारासाठी आणखी स्वस्त दरात औषधं उपलब्ध होणार आहेत. यामध्ये कॅन्सर, हृदयविकार, श्वसन संबंधी रोगांसाठी औषधांचा समावेश आहे. यामुळे दवाखान्यांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कॅन्सर डे केअर सेंटर

निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले की, प्रत्येक सरकारी रुग्णालयात कॅन्सर डे केअर सेंटर तयार केले जातील. हे सेंटर रुग्णांना कॅन्सरच्या उपचारांसाठी अधिक सुलभ सुविधा देईल. यामुळे कॅन्सरवरील उपचारांचा खर्च कमी होईल आणि रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरच्या उपचारांचा सहज प्रवेश मिळेल.

वैद्यकीय शिक्षण संधी, 10,000 अतिरिक्त मेडिकल सीट

निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की, आगामी 5 वर्षांत 10,000 वैद्यकीय कॉलेजच्या जागा वाढवण्यात येतील. यामुळे विद्यार्थ्यांना सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळेल, तसेच प्रायव्हेट कॉलेजमध्ये मोठ्या खर्चाची आवश्यकता नाही. या पाऊलाने भारतात वैद्यकीय शिक्षणाच्या संधींमध्ये मोठी वाढ होईल, ज्यामुळे अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना डॉक्टर बनण्याची संधी मिळेल.

IIT आणि AI शिक्षण, 6500 सीट आणि 3 AI सेंटर

सीतारामन यांनी IIT मध्ये 6,500 सीटांची वाढ आणि 3 नवे AI सेंटर उघडण्याची घोषणा केली. यामुळे देशात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती होईल. त्याचबरोबर, AI शिक्षणासाठी 500 कोटी रुपयांचा विशेष बजेट ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे देशातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल.

शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी योजना

बजेट 2025 मध्ये शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीची योजना जाहीर करण्यात आली आहे. तसेच महिलांसाठी विशेष योजना तयार करण्यात आल्या आहेत ज्यामुळे त्यांना व्यवसाय, शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात अधिक संधी मिळतील.

केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये केंद्र सरकारने रुग्ण, विद्यार्थ्यां, शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. या निर्णयांमुळे सामान्य माणसाच्या जीवनात मोठे बदल होऊ शकतात. बजेटमधील यादीतील शिक्षण, आरोग्य, महिलांसाठीच्या योजनांचा लाभ देशाच्या प्रगतीला दिशा देईल.

आणखी वाचा : 

Budget 2025: अर्थसंकल्पात महिलांना काय मिळालं?, जाणून घ्या महत्वाच्या घोषणा

 

 

Read more Articles on
Share this article