Marathi

राहू करेल बरबाद, बाथरूममध्ये या 5 चुका टाळा

वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये काही चुका केल्यास राहू ग्रह नाराज होतो. यामुळे आर्थिक आणि मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. जाणून घेऊया कोणत्या चुका टाळायला हव्यात.
Marathi

बाथरूम म्हणजे राहूचं स्थान

बाथरूममध्ये कोणताही वास्तुदोष असल्यास त्याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. कारण बाथरूम हे राहूचं स्थान मानलं जातं. पुढे जाणून घेऊया, बाथरूममध्ये कोणती 5 कामं करू नयेत...

Image credits: Getty
Marathi

बाथरूम कधीही अस्वच्छ ठेवू नका

बाथरूमची स्वच्छता रोज केली पाहिजे. ते कधीही अस्वच्छ ठेवू नये. जर तुम्ही बाथरूम अस्वच्छ ठेवलं, तर तुम्हाला राहू ग्रहाशी संबंधित अशुभ परिणामांना सामोरं जावं लागू शकतं.

Image credits: Getty
Marathi

तुटलेली बादली वापरू नका

बाथरूममध्ये कधीही तुटलेली बादली, मग किंवा इतर वस्तू ठेवू नयेत. यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. तसेच, बाथरूममध्ये काळ्या किंवा निळ्या रंगाची बादली ठेवणेही टाळावे.

Image credits: Getty
Marathi

जास्त वेळ घाणेरडे कपडे ठेवू नका

काही लोक अनेक दिवस बाथरूममध्ये घाणेरडे कपडे साठवून ठेवतात. ही सवय अजिबात चांगली नाही. यामुळे राहू ग्रह वाईट फळ देऊ लागतो. कपडे धुतल्यानंतर ते लगेच बाथरूममधून बाहेर काढावेत.

Image credits: Getty
Marathi

पाणी चुकूनही वाया घालवू नका

बाथरूममध्ये जेवढी गरज असेल, तेवढंच पाणी वापरावं. इथे पाण्याची नासाडी केल्यास आपल्या आयुष्यात अडचणी वाढू शकतात. या गोष्टीची विशेष काळजी घ्या.

Image credits: Getty
Marathi

नळातून पाणी टपकू देऊ नका

अनेकदा बाथरूममधील नळ खराब होतात आणि त्यातून सतत पाणी टपकत राहतं. असं झाल्यास घरात पैसा टिकत नाही आणि धनहानी होते. त्यामुळे वेळीच नळ दुरुस्त करून घ्या.

Image credits: Getty

Stylish Bone China Planters: ग्लॉसी फिनिश आणि रॉयल टच! मिळेल नवा लूक

Gold Mangalsutra: काळ्या मण्यांसोबत उठून दिसतील 2 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र पेंडेंट, पाहा 10 प्रीमियम डिझाइन्स

Kanchli Blouse Design: 500 रुपयांच्या साडीलाही द्या रॉयल लुक, ट्राय करा या 7 राजस्थानी कांचली स्टाइल्स

Yellow Lehenga: भावाच्या हळदीत नणंदच दिसेल भारी! लाईमलाईट खेचून घेतील हे 8 पिवळे लेहेंगा