Marathi

चांदीची चमक, सोन्याचा मुलामा; 7 गोल्ड प्लेटिंग सिल्व्हर इअररिंग्स

Marathi

गोल्ड कोटिंग सिल्व्हर स्टड

सोन्याचे कानातले खरेदी करण्याचं बजेट नसेल, तर गोल्ड कोटिंग सिल्व्हर स्टड खरेदी करा. हे दिसायला अगदी खऱ्या सोन्यासारखे चमकतात. 1000-1500 रुपयांमध्ये खरेदी करून स्टायलिश दिसू शकता.

Image credits: instagram
Marathi

हेक्सागोनल पेटल इअररिंग्स

पाकळ्यांच्या (पेटल) आणि षटकोनी (हेक्सागोनल) डिझाइनमधील हे सिल्व्हर इअररिंग्स गोल्ड प्लेटिंगसह येतात. तुम्ही हे पारंपरिक आणि वेस्टर्न कपड्यांवर घालून खूपच स्टायलिश दिसाल.

Image credits: instagram
Marathi

फ्लोरल प्लेटिंग स्टड डिझाइन्स

तुम्ही 5 ग्रॅम चांदीवर गोल्ड कोटिंग असलेली फ्लोरल प्लेटिंग स्टड डिझाइन खरेदी करू शकता. 20 ते 50 वयोगटातील महिलांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. 

Image credits: instagram
Marathi

अँटिक रुबी सिल्व्हर स्टड गोल्ड

हे सिल्व्हर स्टड दिसायला अगदी शुद्ध सोन्याचे असल्यासारखे वाटतात. मध्यभागी असलेला रुबी स्टोन याला रॉयल लुक देतो. रोजच्या वापरासाठी शोधत असाल तर हे स्टड्स खरेदी करू शकता.

Image credits: instagram
Marathi

सिल्व्हर स्टड टॉप्स डिझाइन

टिअरड्रॉप शेप आणि फ्लोरल डिझाइनमधील गोल्ड कोटिंग सिल्व्हर स्टड टॉप्स हे स्टाईल आणि ग्रेसचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. तुम्ही हे 500 ते 1000 रुपयांपर्यंत घेऊ शकता. 

Image credits: instagram
Marathi

हार्टशेप स्क्वेअर कट स्टड

एनॅमल अँटिक डिझाइन आणि हार्टशेपमधील स्क्वेअर कट स्टड रॉयल आणि फेमिनिन लुक देतात. तुम्हाला भडक आणि हेवी वर्क आवडत नसेल तर अशा लहान डिझाइनमध्ये गुंतवणूक करू शकता.

Image credits: instagram
Marathi

लीफ शेप स्टड डिझाइन सिल्व्हर

चांदीचा बेस, गोल्डन कोटिंग असलेले लीफ शेप स्टड फ्युजन, फॅशनसाठी उत्तम आहेत. अशी डिझाइन दिसायला खूप हेवी वाटते. कमी बजेटमध्ये वजनदार दिसणारे कानातले शोधत असाल हा चांगला पर्याय आहे.

Image credits: instagram

Silver Pendant: फक्त ३०० रुपयांत नावाच्या अक्षराचं सिल्व्हर लॉकेट, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी बेस्ट गिफ्ट!

Purple Banarasi Saree: वयाच्या 60 मध्येही दिसाल 30 सारख्या, पाहा जांभळ्या बनारसी साडीचे 6 शाही प्रकार

स्टाईलिश दिसायचा शॉर्टकट, गोल्ड स्टड नोज पिन

Mobile Market: आयफोन 15 आता फक्त 34,900 रुपयांत? काय आहे ही भन्नाट ऑफर