Marathi

रात्री फोन वापरता? फक्त एक सेटिंग बदला, डोळे राहतील सुरक्षित!

Marathi

ब्लू लाइट फिल्टर ऑन करा

फोनच्या स्क्रीनमधून येणारा ब्लू लाइट डोळ्यांना लवकर थकवतो आणि झोपेवर परिणाम करतो. यासाठी सेटिंग्समध्ये जाऊन डिस्प्ले पर्यायात 'ब्लू लाइट फिल्टर' किंवा 'नाइट मोड' ऑन करा.

Image credits: Getty
Marathi

डार्क मोडचा वापर करा

डार्क मोड डोळ्यांसाठी आरामदायक व बॅटरीचीही बचत करतो. सेटिंग्समध्ये डिस्प्ले पर्यायात जाऊन डार्क मोड ऑन करा. व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, यूट्यूबध्येही इन-बिल्ट डार्क मोड सेटिंग असते.

Image credits: Freepik
Marathi

ब्राइटनेस ऑटोमॅटिक ठेवा

ऑटो ब्राइटनेस फीचर ऑन केल्यास, फोन तुमच्या आजूबाजूच्या प्रकाशानुसार स्क्रीनची ब्राइटनेस आपोआप ॲडजस्ट करतो. फोनच्या सेटिंग्समध्ये डिस्प्लेमधील Adaptive Brightness पर्याय निवडा.

Image credits: Freepik
Marathi

स्क्रीन टाइम लिमिट सेट करा

जास्त वेळ सोशल मीडिया किंवा गेमिंगमध्ये व्यस्त राहिल्यास डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. फोनच्या सेटिंग्समधील 'डिजिटल वेलबीइंग' (Digital Wellbeing) मध्ये जाऊन ॲप टायमर सेट करा.

Image credits: Freepik
Marathi

रीडिंग मोड किंवा व्हाइट टोन ॲडजस्ट करा

काही फोन्समध्ये 'रीडिंग मोड'चा पर्याय असतो, ज्यामुळे स्क्रीनला पिवळसर किंवा हलका टोन येतो. हे फीचर सुरू करण्यासाठी सेटिंग्समध्ये डिस्प्ले पर्यायात जाऊन 'रीडिंग मोड' निवडा.

Image credits: Freepik
Marathi

अँटी-ग्लेअर स्क्रीन प्रोटेक्टर लावा

तुम्ही जर जास्त वेळ फोन वापरत असाल, तर अँटी-ग्लेअर किंवा मॅट फिनिश असलेलं स्क्रीन प्रोटेक्टर लावणं फायदेशीर ठरू शकतं. यामुळे स्क्रीनवरील रिफ्लेक्शन कमी होतं.

Image credits: Freepik
Marathi

२०-२०-२० नियमाचं पालन करा

प्रत्येक २० मिनिटांनी, २० सेकंदांसाठी, २० फूट दूर असलेल्या कोणत्याही वस्तूवर लक्ष केंद्रित करा. यामुळे डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळतो आणि थकवा कमी होतो. 

Image credits: Freepik

मोबाईलमधून डिलीट झालेले फोटो परत कसे मिळवायचे? वाचा ट्रिक्स!

बायकोला द्या खास गिफ्ट; या सुंदर डिझाईन्स पाहून ती म्हणेल ‘वा!’

पायात घाला ब्रजवासी पायल; सिल्व्हरचे हे 7 डिझाइन्स पाहून व्हाल फिदा

साडीवर मिरवा ट्रेंडी मंगळसूत्र; हे डिझाइन्स पाहून म्हणाल, ‘व्वा!’