Marathi

ऑफिसच्या वॉटर बॉटलला घाण वास येतोय? या आहेत 5 डीप क्लीनिंग ट्रिक्स

Marathi

पाण्याच्या बाटलीला वास येतोय?

आपण रोज पाणी पिण्यासाठी किंवा ऑफिसला नेण्यासाठी वॉटर बॉटल वापरतो. पण अनेकदा धुतल्यानंतरही बाटलीला एक विचित्र वास येतो. 

Image credits: instagram And AI Image
Marathi

५ सोप्या आणि डीप क्लीनिंग ट्रिक्स

जर बाटलीची वेळोवेळी योग्य प्रकारे स्वच्छता केली नाही, तर त्यात जंतू वाढू शकतात. अशावेळी या ५ सोप्या डीप क्लीनिंग ट्रिक्स वापरून  बाटली स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त ठेवू शकता.

Image credits: instagram And AI Image
Marathi

बेकिंग सोड्याने करा डीप क्लीनिंग

बाटलीत १ चमचा बेकिंग सोडा टाका आणि त्यात कोमट पाणी भरा. झाकण लावून बाटली चांगली हलवा. २०-३0 मिनिटांनी ब्रशने स्वच्छ घासून धुवा. यामुळे वास आणि डाग दोन्ही निघून जातील.

Image credits: instagram And AI Image
Marathi

लिंबू आणि गरम पाण्याचा वापर

लिंबामध्ये असलेलं ॲसिड बॅक्टेरिया कमी करण्यास मदत करतं. एका लिंबाचा रस बाटलीत पिळा आणि त्यात गरम पाणी भरा. १५-२० मिनिटं तसंच ठेवा आणि नंतर ब्रशने स्वच्छ करून धुऊन टाका.

Image credits: instagram And AI Image
Marathi

व्हिनेगरने हटवा हट्टी वास

पांढरं व्हिनेगर (White Vinegar) वास आणि बॅक्टेरिया घालवण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं. बाटली अर्धी पाण्याने भरा.त्यात २-३ चमचे व्हिनेगर मिसळून रात्रभर तसंच ठेवा. सकाळी बाटली धुवा.

Image credits: instagram And AI Image
Marathi

मीठ आणि बर्फाने स्क्रब करा

जर बाटलीच्या आत डाग जमा झाले असतील, तर ही पद्धत खूप कामी येते. बाटलीत थोडं जाडं मीठ आणि काही बर्फाचे तुकडे टाका. बाटली जोरजोरात हलवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाका.

Image credits: instagram And AI Image
Marathi

बॉटल ब्रशने करा योग्य स्वच्छता

अनेकदा बाटलीचा आतला भाग हाताने नीट स्वच्छ होत नाही. त्यासाठी लांब दांड्याचा बॉटल ब्रश वापरा. बाटलीचं झाकण आणि त्यातील रबर रिंग वेगळी काढून स्वच्छ करा. 

Image credits: instagram And AI Image

Hina Khan Fashion: हिना खानचे ओवर-लेंथ सूट; नवरात्री आणि रमजानसाठी हे 7 डिझाइन्स देतील नूरानी लूक

Eid Fashion: यंदाच्या ईदला ट्राय करा हानिया आमिरचे हे 7 सुंदर सूट, सगळेच करतील कौतुक!

Gangaur Look: लग्नानंतरच्या पहिल्या गणगौर पूजेसाठी खास राजस्थानी पोशाख, दिसाल अगदी गौरीसारख्या सुंदर

चेहऱ्यावर टॅनिंग टाळायचं असेल तर काय करायला हवं, काय करावा उपाय?