प्रेमानंद महाराजांनी आपल्या प्रवचनात ५ अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही बदलू नयेत, परिस्थिती काहीही असो. असं केल्याने दोष लागतो. जाणून घ्या कोणत्या आहेत या ५…
प्रेमानंद महाराजांच्या मते, गुरुची निवड एकदाच विचारपूर्वक करावी. एकदा एखाद्याला गुरु मानल्यानंतर तो सोडू नये. असं केल्याने महापाप लागतं.
ज्यांना तुम्ही गुरु मानलं आहे, जर ते तुम्हाला एखादा मंत्र देतील तर त्याचाच जप तुम्ही आयुष्यभर करावा. स्वतःच्या मर्जीने किंवा दुसऱ्याच्या सांगण्यावरून मंत्र बदलू नये.
गुरु जर तुम्हाला एखादा धर्मग्रंथ देतील तर तो आयुष्यभर जवळ बाळगावा. परिस्थिती काहीही असो. त्याऐवजी तोच धर्मग्रंथ नवीन आणू नये. असं करण्यापासून वाचा.
ज्याला तुम्ही आपला इष्टदेव मानता त्याचीच आयुष्यभर पूजा करा. त्याच्या जागी दुसऱ्या देवाला इष्टदेव बनवू नका. हे इष्टदेव कुलपरंपरेनुसार किंवा गुरुपरंपरेनुसारही असू शकतात.
ज्या माळेने तुम्ही दररोज मंत्रजप करता, ती जर तुटली तर तीच दुरुस्त करून पुन्हा वापरा. मंत्रजपाची माळ वारंवार बदलू नये.