Marathi

स्नेक फिंगर रिंग: लांब बोटांसाठी एक बोल्ड फॅशन स्टेटमेंट

आजकाल स्नेक फिंगर रिंगचा ट्रेंड खूप वाढला आहे. जर तुमची बोटं लांब असतील, तर हे डिझाइन तुमच्यासाठी एक परफेक्ट बोल्ड फॅशन स्टेटमेंट ठरू शकतं.
Marathi

काय आहे स्नेक फिंगर रिंगचं वैशिष्ट्य?

स्नेक फिंगर रिंगचं डिझाइन सापाच्या आकारावरून प्रेरित आहे. ही अंगठी बोटाला वेटोळे घातलेल्या सापासारखी दिसते. त्यामुळे ती खूप स्टायलिश आणि आकर्षक वाटते.

Image credits: Instagram
Marathi

का घालावी स्नेक फिंगर रिंग?

अनेक परंपरांमध्ये सापाला शक्ती, बुद्धी, संरक्षण आणि बदलाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळेच स्नेक रिंग फक्त एक दागिना नाही, तर एक पारंपरिक ॲक्सेसरी म्हणूनही ओळखली जाते.

Image credits: Instagram
Marathi

लाइटवेट स्नेक फिंगर रिंग

तुम्हाला हलक्या वजनाची अंगठी आवडत असेल, तर हे डिझाइन तुमच्यासाठी परफेक्ट आहे. यामध्ये सोन्याच्या पातळ तारेला पिळ देऊन सापासारखा पॅटर्न तयार केला आहे. 

Image credits: Instagram
Marathi

स्टोन वर्क स्नेक फिंगर रिंग

सोन्याच्या बेसवर छोटे क्रिस्टल स्टोन आणि डायमंड असलेली अंगठी तुम्ही निवडू शकता. या डिझाइनमध्ये सापाचा चेहरा क्रिस्टल स्टोनने सजवला आहे.

Image credits: Instagram
Marathi

बँड स्टाइल स्नेक रिंग

ज्यांना लांब, पिळदार अंगठी घालायला आवडत नाही, त्यांच्यासाठी बँड स्टाइल स्नेक रिंग सर्वोत्तम पर्याय आहे. ही अंगठी ॲडजस्टेबल डिझाइनची आहे.

Image credits: Instagram
Marathi

ट्विस्टेड स्नेक रिंग

सापाचा चेहरा असलेल्या अंगठीऐवजी तुम्ही स्नेक पॅटर्नची साधी अंगठी निवडू शकता. या डिझाइनमध्ये फक्त सापाच्या शरीराचा पिळदार पॅटर्न तयार केला आहे.

Image credits: Pinterest
Marathi

ग्रीन स्टोन स्नेक रिंग

सोन्याच्या बेसवर बनवलेली ग्रीन स्टोन स्नेक रिंग खूपच रॉयल आणि युनिक दिसते. यामध्ये सापाचा चेहरा 3D टेक्सचरसह तयार केला आहे आणि डोळ्यांच्या जागी हिरव्या रंगाचे खडे लावले आहेत.

Image credits: Pinterest

Rainbow Necklace: प्रत्येक आऊटफिटमध्ये भरतील रंग, निवडा 7 ट्रेंडी डिझाइन्स

Kids Anklets: १ ते ५ वर्षांच्या मुलांसाठी ६ पैंजण डिझाइन्स, पायांना येईल चांदीसारखी चमक

Pearl Choker: उन्हाळ्यात तुमचा लूक खुलवतील मोती चोकरच्या 'या' 6 एलिगेंट डिझाइन्स

Gold Earrings: प्रत्येक वयोगटातील महिलांना शोभून दिसतील या गोल्ड कुंडल बाली डिझाइन्स