Marathi

पावसाळ्यात बनवा खास मसालेदार चहा

सकाळी एक कप सुगंधी, चविष्ट चहा प्यायल्यास दिवसभर फ्रेश आणि ताजेतवाने वाटते.

Marathi

कडक चहा

पावसाळ्याच्या गारव्यात गरमागरम आणि थोडा झणझणीत चहा पिण्याची मजाच काही और असते. तुम्ही घरीच अगदी सोप्या पद्धतीने असा कडक चहा बनवू शकता.

Image credits: instagram
Marathi

मसाला चहासाठी लागणारे साहित्य

पाणी: 1 कप, दूध: 1/2 कप, चहा पावडर: 2 टीस्पून, साखर: दीड टीस्पून, 1/2 इंच आलं, 1 लवंग/दालचिनी, एक चिमूट वेलची पूड.

Image credits: instagram
Marathi

चहा पावडर कधी टाकावी?

मसाल्यांचा सुगंध येऊ लागल्यावर त्यात चहा पावडर टाका. चहाला चांगला रंग येईपर्यंत 2-3 मिनिटे उकळणे महत्त्वाचे आहे. यामुळे चहाची चव आणखी वाढते.

Image credits: Social media
Marathi

चहा बनवण्याची पद्धत

सर्वात आधी पाणी उकळायला ठेवा. नंतर त्यात किसलेले आले, वेलची, लवंग आणि दालचिनी घालून 3-4 मिनिटे चांगले उकळू द्या. मसाल्यांचा सुगंध दरवळेपर्यंत पाणी उकळा.

Image credits: Social media
Marathi

रंग, चव आणि सुगंध

चहाला रंग आल्यावर त्यात दूध आणि साखर घालून 3-4 मिनिटे उकळू द्या. या सर्व स्टेप्समुळे चहाला गडद रंग, कडक चव आणि अप्रतिम सुगंध येतो.

Image credits: Social media
Marathi

चहासोबत कुरकुरीत पदार्थ

शेवटी, चहा गाळून घेतला की पिण्यासाठी तयार! पाऊस पडत असताना असा गरमागरम चहा बनवून भजी किंवा बिस्किटांसोबत पावसाळ्याचा आनंद घ्या.

Image credits: Social media

Health Tips: वजन कमी करण्यासाठी घरीच बनवा 7 जादुई डिटॉक्स ड्रिंक्स!

Brain Health: मेंदू तल्लख, स्मरणशक्ती मजबूत करणारे बेस्ट ड्रायफ्रुट्स

महिलांसाठी स्टड इअररिंग्जचा ट्रेंड; साधेपणातही खुलतो आकर्षक लूक

Patchwork Lehenga: शिल्लक राहिलेल्या कापडाच्या तुकड्यांपासून बनवा पॅचवर्क लेहेंगा, सगळे विचारतील कुठून घेतला?