घरचा सब्जा उन्हाळ्यात देणार थंडावा, कुंडीत अशी करा लागवड
Utility News Feb 11 2026
Author: vivek panmand Image Credits:Getty
Marathi
सब्जा म्हणजे काय?
सब्जा (तुकमरीया) म्हणजे गोड तुळशीच्या बिया असतात. उन्हाळ्यात शरबत, फालुदा, ड्रिंक्समध्ये वापरतात आणि शरीराला थंडावा देतात.
Image credits: Getty
Marathi
सब्जाची लागवड करायला काय लागणार
आपल्याला घरच्या घरी सब्जाची लागवड करायची असेल यासाठी छोटी कुंडी किंवा ट्रे, सब्जा बिया, भुसभुशीत माती + कंपोस्ट आणि पाणी आणि सूर्यप्रकाश लागणार आहे.
Image credits: Getty
Marathi
बिया कशा पेरायला हव्यात?
माती कुंडीत भरा, वरून सब्जा बिया हलक्या पेरून टाका आणि जास्त खोल दाबू नका. हे सगळं झाल्यानंतर वरून हलके पाणी शिंपडा, त्यानंतर झाडाला चांगली तरतरी मिळायला मदत होईल.
Image credits: Getty
Marathi
झाडाला सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा
रोज 3–4 तास ऊन मिळू द्या. माती ओलसर ठेवा, पण पाणी साचू देऊ नका. 5–7 दिवसात उगवतात.
Image credits: Getty
Marathi
वाढीसाठी काय काळजी घ्यायला हवी?
रोप 20–30 दिवसात वाढते, गरज वाटल्यास सेंद्रिय खत द्या. जास्त गर्दी असेल तर रोपे विरळ करून टाका. आपल्या झाडाची वाढ चांगली होतेय का नाही याकडे लक्ष द्या.
Image credits: Getty
Marathi
झाडाच्या बिया कधी काढाव्यात?
झाडाला फुले आल्यावर बिया तयार होतात. फुले वाळल्यानंतर काढून सुकवा, त्यातून सब्जा बिया मिळतात.