Marathi

पॅशन फ्रूट

पॅशन फ्रूट घरी लावणं खूप सोपं आहे. चला, याच्या सोप्या स्टेप्स काय आहेत ते पाहूया.
Marathi

योग्य जात निवडा

तुमच्या हवामानानुसार योग्य जात निवडा. पिवळी, जांभळी किंवा 'कावेरी' सारख्या हायब्रीड जातींचा तुम्ही विचार करू शकता.
Image credits: Getty
Marathi

सूर्यप्रकाश गरजेचा

पॅशन फ्रूटच्या चांगल्या वाढीसाठी अशी जागा निवडा, जिथे दिवसातून किमान ६-८ तास थेट सूर्यप्रकाश मिळेल.
Image credits: Getty
Marathi

जमीन तयार करा

जमिनीत रोप लावणार असाल, तर ६० सेंटीमीटर खोल आणि रुंद खड्डा खणा. त्यात माती आणि सेंद्रिय खत मिसळून तो भरा.
Image credits: Getty
Marathi

टेरेसवरही लावू शकता

जागा कमी असेल तर काळजी करू नका. तुम्ही मोठ्या ड्रममध्ये किंवा २५ किलोच्या ग्रो-बॅगमध्येही पॅशन फ्रूट लावू शकता.
Image credits: Getty
Marathi

वेलासाठी मांडव

हा एक वेल असल्यामुळे त्याला वाढण्यासाठी आधाराची गरज असते. जी.आय. वायर किंवा नायलॉनच्या जाळीचा वापर करून एक मजबूत मांडव तयार करा.
Image credits: Getty
Marathi

पाणी जपून द्या

रोपाच्या मुळाशी नेहमी ओलावा राहील याची काळजी घ्या. पण लक्षात ठेवा, पाणी साचून राहणार नाही, नाहीतर मुळं सडू शकतात.
Image credits: Getty
Marathi

सेंद्रिय खतांचा वापर

रोपाच्या जलद वाढीसाठी नियमित अंतराने शेणखत, हाडांचा चुरा आणि शेंगदाणा पेंड यांसारखी सेंद्रिय खतं द्या.
Image credits: Getty
Marathi

छाटणी करणे महत्त्वाचे

फळांची काढणी झाल्यावर वेलाच्या सुकलेल्या फांद्या छाटून टाका. यामुळे नवीन फांद्या फुटतात आणि अधिक फुलं येतात.
Image credits: Getty
Marathi

फळमाशीपासून बचाव

फळं लागल्यावर फळमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फेरोमोन सापळे (pheromone traps) लावा किंवा फळांना लहान पिशव्यांनी झाका.
Image credits: Getty
Marathi

कृत्रिम परागन

जर तुमच्या वेलाला कमी फळं लागत असतील, तर संध्याकाळच्या वेळी फुलांमध्ये हाताने परागन (artificial pollination) करा. यामुळे फळधारणा वाढून उत्पन्न वाढेल.
Image credits: Getty

Silver Bangles: 10 हजारांत मिळवा प्रीमियम लुक, या चांदीच्या बांगड्या ठरतील तुमची ओळख

Gold Bow Mangalsutra: सोन्याच्या मंगळसूत्रात 'बो' डिझाइनचा नवा ट्रेंड, पाहा लेटेस्ट पॅटर्न्स

Blue Stone Toe Ring: पायांना मिळेल नवी 'ब्लू शाइन', पाहा जोडव्यांच्या लेटेस्ट डिझाइन्स

Maang Tikka Designs: मामाच्या लग्नात भाची दिसेल एकदम क्युट, पाहा मांग टिक्याच्या 6 सुंदर डिझाइन्स