Marathi

वाईनची बाटली फेकू नका, घर सजवण्यासाठी वापरा या 8 सोप्या आयडिया

घरात अनेकदा वाईनच्या रिकाम्या बाटल्या पडून असतात. त्या फेकून देण्याऐवजी तुम्ही त्यांचा वापर करून घरासाठी सुंदर सजावटीच्या वस्तू बनवू शकता. यासाठी काही सोप्या आयडिया पाहूया.
Marathi

वाईनच्या बाटलीपासून बनवा बांगड्यांचं स्टँड

रिकामी वाईनची बाटली फेकून देण्याऐवजी तुम्ही तिचा वापर बांगड्या ठेवण्यासाठी करू शकता. यात तुम्ही तब्बल 2 डझन बांगड्या सहज ठेवू शकता. हा एक सुरक्षित बँगल ऑर्गनायझर आहे.
Image credits: GEMINI AI
Marathi

मसाले किंवा ड्राय स्टोरेजसाठी वापर

लहान आकाराच्या बाटल्यांमध्ये तुम्ही चहा पावडरपासून ते खडे मसाले सहज ठेवू शकता. यामुळे तुमची जागाही वाचेल आणि बाटलीचा योग्य वापरही होईल.
Image credits: GEMINI AI
Marathi

बाटली रंगवून बनवा डेकोर पीस

वाईनच्या बाटलीवर ॲक्रेलिक पेंट, ग्लिटर किंवा रिबनने सुंदर फ्लोरल डिझाइन तयार करा. मग त्यात कृत्रिम फुलं ठेवून सजावट करा. असे डेकोर पीस दिसायला खूप रॉयल लूक देतात.

Image credits: PINTEREST
Marathi

काचेच्या बाटलीपासून बनवा प्लांटर

तुमच्याकडे ग्लास कटर असेल, तर तुम्ही वाईनची बाटली वरून उभी कापून तिचे सुंदर छोटे प्लांटर्स तयार करू शकता. यात तुम्ही छोटी रोपं लावू शकता.
Image credits: GEMINI AI
Marathi

बनवा आकर्षक कॅण्डल होल्डर

वाईनच्या बाटलीचं वरचं तोंड अरुंद असतं. त्यामुळे त्यात थोडी जाड मेणबत्ती सहज बसू शकते. तुम्ही बाटलीला रंग देऊन किंवा न देताही तिचा कॅण्डल होल्डर म्हणून वापर करू शकता.
Image credits: GEMINI AI
Marathi

शिंपल्यांनी करा सजावट

जर तुम्हाला रंगीत वाईनची बाटली सजवून ठेवायची असेल, तर तुम्ही तिला शिंपले आणि मोत्यांनी सजवून शेल्फवर ठेवू शकता. यामुळे तिला एक वेगळाच लूक येतो.
Image credits: PINTEREST
Marathi

वाईनच्या बाटलीचा बनवा सुंदर लॅम्प

काचेच्या बाटलीत LED लाईट्स टाकून तुम्ही तिला डेकोरेटिव्ह लॅम्पप्रमाणे लिव्हिंग रूममध्ये सजवू शकता. सोबतच आकर्षक बटरफ्लाय स्टिकर्सचाही वापर करू शकता.
Image credits: PINTEREST

Leg Foot Mehndi Designs: पायावर काढा या 7 सुंदर मेहंदी डिझाइन्स, साध्या पायांनाही मिळेल रॉयल लुक

Punjabi Payal: नवरीला मिळेल रिच ट्रेडिशनल लूक, ट्राय करा चांदीच्या 'या' 6 पैंजण डिझाइन्स

Hairstyles for Broad Forehead: मोठं कपाळ लपवण्यासाठी ट्राय करा श्रद्धा कपूरच्या या 7 स्टायलिश हेअरस्टाइल्स

Silver Jhumki: एथनिक लुकला देतील मॉडर्न टच, ट्राय करा या 6 खास टॅसल झुमकी डिझाइन्स