आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या एका नीतिमध्ये ४ अशा कामांबद्दल सांगितले आहे जे कधीही अर्धवट सोडू नयेत. नाहीतर नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो. जाणून घ्या कोणती आहेत ही ४ कामं…
जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असेल तर ते पूर्णपणे फेडा. नाहीतर अर्धवट कर्जाचे व्याज भरत राहून तुम्ही त्रस्त होऊ शकता आणि आर्थिक परिस्थितीही बिघडू शकते.
कोणत्याही रोगाचा उपचार पूर्ण करावा, जोपर्यंत तो रोग मुळापासून नष्ट होत नाही. जर रोगाचा उपचार मध्येच थांबवला तर तो रोग पुन्हा मोठे रूप धारण करू शकतो.
जर कुठे आग लागली तर ती पूर्णपणे विझत नाही तोपर्यंत पाणी टाकत राहा. जर आग पूर्णपणे विझवली नाही तर एक छोटीशी ठिणगी पुन्हा भडकून मोठे नुकसान करू शकते.
जर कोणाशी तुमचे शत्रुत्व असेल तर कोणत्याही प्रकारे त्याचा निपटारा करा. नाहीतर हे शत्रुत्व तुम्हाला कधीतरी भारी पडू शकते. लक्षात ठेवा आपल्याला शत्रुत्व संपवायचे आहे, शत्रूला नाही.