बाबा बागेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेले पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आपल्या एका प्रवचनात मृत्यूच्या ४ चिन्हे म्हणजेच अवस्थांबद्दल सांगितले आहे. पुढे जाणून घ्या या चिन्हांबद्दल…
बाबा यांच्या मते, ‘मृत्यूपूर्वीचे पहिले चिन्ह म्हणजे केस पांढरे होणे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे केस पांढरे होऊ लागतात तेव्हा त्याने सावध व्हायला हवे आणि भक्तीत लीन व्हायला हवे.’
बाबा बागेश्वर यांच्या मते, ‘डोळ्यांनी कमी दिसणे हे मृत्यू येण्याचे दुसरे चिन्ह आहे. असे झाल्यावर पाप कर्मांचा त्याग करावा आणि दानधर्म करायला सुरुवात करावी.’
बाबा बागेश्वर यांच्या मते, ‘मृत्यू येण्यापूर्वी माणसाला कमी ऐकू येऊ लागते. जर ही अवस्था दिसू लागली तर संसाराच्या प्रपंचांपासून दूर राहून ईश्वराची उपासना करावी.’
बाबा बागेश्वर यांच्या मते, ‘मृत्यूची चौथी आणि अंतिम अवस्था म्हणजे कंबर वाकणे. या स्थितीत आल्यानंतर कोणाचीही निंदा करू नका. व्रत-उपवास करून परलोक सुधारण्याचा प्रयत्न करावा.’
बाबा बागेश्वर यांच्या मते, ‘पहिले चिन्ह मिळाल्यावर जर व्यक्ती आपली कर्मे सुधारली तर अंतिम चिन्हापर्यंत त्याला परब्रह्माचे ज्ञान होते, ज्यामुळे त्याला मोक्ष मिळू शकतो.’